औसा/ मुख्तार मणियार:
राज्यभरातील नगरपरिषद/नगर पंचायती आणि औद्योगिक नागरी कर्मचारी संघटनेच्या वतीने दि.११ आॅगस्ट २०२० मंगळवार रोजी एक दिवसीय कामकाज बंद आंदोलन पुकारण्यात आले होते.नगरपरिषद क्षेत्रातील अधिकारी- कर्मचा-यांच्या अनेक मागण्या प्रलंबित असल्याने कर्मचारी अडचणीत होते.म्हणून संघटनेने दि.११ जुलै २०२० रोजी प्रशासनाला एक दिवसाचे कामकाज बंद आंदोलन करुन संप करण्याचा निर्णय घेतला होता.तथापी नगरपरिषद/नगर पंचायत आस्थापना व संवर्ग कर्मचा-यांच्या प्रलंबित मागण्यांवर नगर परिषद प्रशासन संचनालय मार्फत कार्यवाही सुरू आहे.
तसेच सध्या चालू असलेल्या कोविड-१९ मुळे उध्दभवलेल्या आपत्तीजनक परिस्थितीत नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेले दि.११ आॅगस्ट २०२० रोजी कामबंद आंदोलन मागे घ्यावे, असे पत्र कल्पिता पिंगळे,संचालक, नगर परिषद प्रशासन संचनालय मुंबई यांनी दि.१० आॅगस्ट २०२० रोजी आयुक्त तथा संचालक नगर परिषद संचनालय यांचे आदेश काढले असल्याने नगर परिषद कर्मचा-यांच्या नियोजित संप मागे घेण्यात आलाआहे.

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती