
आटपाडी शाखेत संजीवनी ठेव योजनेचा धनादेश प्रदान व जिल्हा,शाखा सल्लागारांची निवड व सत्कार संपन्न
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी:
शिक्षण सेवक सहकारी सोसायटीचा कारभार पारदर्शक असून सभासद हिताचा आहे,असे प्रतिपादन चेअरमन प्रकाश बन्ने यांनी केले.
आटपाडी येथील शाखेत आयोजित जिल्हा व शाखा सल्लागारांचा सत्कार व सभासद कै.सुभाष पाटील यांच्या वारसांना संजीवनी ठेव मदतनिधीचा धनादेश प्रदान कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
व्हाईस चेअरमन सौ.निलांबरी पाटील,संचालक संताजी घाडगे, संतोष नाईक,राजेंद्र खांडेकर,संतोष वाटवे,अरविंद जैनापुरे,शैलेंद्र गोंधळे,राणी यादव,माजी व्हाईस चेअरमन आर.एस.पाटील, बी.ए.पाटील,संतोष पाटील,एल.जी.खटके, टी.ए.पाटील,नानासाहेब पाटील,दादासो मोटे,आर.आर.चव्हाण,कुमार जावीर,दिलावर मुलाणी,सौ.साधना चव्हाण,आर.एल.खटके,एच.एम.वळकुंडे,बी.एच.मुलाणी, विक्रम कबीर,किरण भगरे आदि मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविक व स्वागत संचालक संतोष नाईक यांनी केले.
या कार्यक्रमाचे संयोजन व व्यवस्थापन आटपाडी शाखेचे शाखाधिकारी संतोष खराडे यांनी केले. गणेश ऐवळे यांनी आभार मानले. कोल्हापूर येथील गोखले कॉलेजमधील सेवानिवृत्त प्राध्यापक उत्तमराव मोटे यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना चेअरमन प्रकाश बन्ने पुढे म्हणाले, सर्व सभासदांनी शिक्षण सेवक सहकारी सोसायटीचा कारभार सांभाळण्याची जबाबदारी दिली आहे. संस्थेच्या हिताच्या कार्यासाठी सर्वांनी सहकार्य करा,आम्ही तुम्हाला सहकार्य करु. सोसायटीची सर्वसाधारण वार्षिक सभा सहा ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व सभासदांनी उपस्थित रहावे असे आवाहन करून ते म्हणाले की, आपणास प्राप्त होणाऱ्या अहवालाचा परिपूर्ण अभ्यास करा.सर्वांनी मिळून संस्थेची प्रगती करूया.
पिंपरी हायस्कूल,पिंपरी खुर्द या शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षण सेवक सहकारी सोसायटीचे सभासद कै.सुभाष महादेव पाटील यांचे मे महिन्यामध्ये दुःखद निधन झाले. त्यांच्या वारसदार श्रीम.मनिषा पाटील यांना संजिवनी ठेव मदतनिधीचा धनादेश संचालक संतोष नाईक, राजेंद्र खांडेकर,माजी संचालक आर.एस.पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
शिक्षण सेवक सहकारी सोसायटी लिमिटेड सांगलीच्या जिल्हा सल्लागारपदी निवड झाल्याबद्दल संतोष पाटील व लक्ष्मण खटके यांना निवडीचे पत्र देऊन सत्कार करण्यात आला.तसेच आटपाडी शाखेच्या सल्लागारपदी निवड झाल्याबद्दल कुमार जावीर,पोपट जाधव,रवींद्र पवार,आबासो भानुसे,हणमंत वळकुंडे,दादासो मोटे, बाळकृष्ण सोनवणे, दिलावर मुलाणी,दिपक गरदडे, बालेखान मुलाणी,रमेश चव्हाण,सौ.साधना चव्हाण यांना निवडीचे पत्र देऊन सत्कार करण्यात आला.

संबंधित बातम्या
औषध विक्री दुकानांत सीसीटीव्ही बसवण्याचे आवाहन
सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी वाढीव निधी देऊ – उपमुख्यमंत्री अजित पवार
दहिवडी न्यायालयाच्या वतीने राष्ट्रीय लोकअदालतीचे यशस्वी आयोजन