

नंदकुमार विभुते
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
माडगुळे
सांगोला-आटपाडी मार्गावर माडगुळेनजीक चिंध्यापीर पाटीजवळ टेम्पो व स्कुटी यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात आटपाडी येथील दोन तरुणी जखमी झाल्या आहेत.
घटनास्थळावरून मिळालेली प्राथमिक माहिती अशी की,आटपाडी येथील दोन तरुणी स्कुटी दुचाकीवरून (क्रमांक MH-10- BV-4149) सांगोला येथील लग्नकार्यास निघाल्या होत्या.चिंध्यापीर पाटीजवळ नाझऱ्याकडून येणाऱ्या टेम्पोची (क्रमांक MH-45- T-2158) समोरासमोर धडक झाली. त्यामध्ये त्या जखमी झाल्या.त्या जखमींना आटपाडी येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती