
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या किसननगर नगरीतून ठाणे-२ आगाराची ठाणे-आटपाडी-ठाणे ही एसटी बस सेवा आजपासून नव्याने सुरू करण्यात आली आहे.आटपाडी आगाराचे आगार प्रमुख राहुल देशमुख, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सांगली जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात,पी.एन.कदम, वाहतूक नियंत्रक मोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत आटपाडी येथून आज सायंकाळी ५.३० वाजता ही बस रवाना करण्यात आली. खरसुंडी,कलेढोण, मायणी मार्गे ही बस सुरू करण्यात आली आहे.
आटपाडीसह या भागातून ठाणे परिसरामध्ये ये-जा करणारा प्रवासी वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. परंतु या मार्गावर आजअखेर महामंडळाची कोणतीही एसटी बस सेवा सुरू नव्हती. त्यामुळे पर्यायी मार्गाने प्रवासी प्रवास करीत होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या किसननगर या भागातून रात्री ९.०० वाजता निघालेली स्लीपर कोच बस ठाणे-२ आगारातून आटपाडी येथे आज सकाळी ८.३० वाजता पोहोचली. त्यानंतर आटपाडी येथे आज पहिल्या फेरीचे उद्घाटन आटपाडी एसटी आगाराचे आगार प्रमुख राहुल गायकवाड, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सांगली जिल्हा अध्यक्ष राजेंद्र खरात, एन.पी.कदम, वाहतूक नियंत्रक मोटे,विलास धांडोर,प्रकाश कांबळे,सचिन बुधावले,चंदन बाबर,ऋषिकेश चोथे,आदींच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी पहिल्या फेरीची बस घेऊन आलेले वाहक एम.जी.भिवंडे,चालक पी.एन.शिंदे यांचा आगार प्रमुख देशमुख व राजेंद्र खरात यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
आटपाडी बस स्थानकातून ही बस सायंकाळी ५.३० वाजता सुटणार असून बनपुरी,खरसुंडी,कलेढोण, मायणी या मार्गे ही बस जाणार आहे. किसननगर येथून रात्री ९.०० वाजता तर ठाणे-२ येथून ९.३० वाजता ही बस सुटणार असून दुसऱ्या दिवशी सकाळी ८.३० वाजेपर्यंत पोहोचणार आहे. प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती