आधी झाडल्या गोळ्या! मग डोक्यात घातला दगड, नगरसेवकाची दिवसा ढवळ्या हत्या;

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
जत

जतमध्ये भाजप नगरसेवक विजय ताड गोळ्या झाडून हत्या करण्यात आलीय. विजय ताड यांची कार अडवून अज्ञातांनी हल्ला चढवला आणि ताड यांच्यावर गोळ्या झाडल्या. जतमधल्या सांगोला रोडवरील अल्फान्सो स्कूलजवळ भरदिवसा घडलेल्या घटनेनं दहशत निर्माण झालीय.
शेगाव रोडवरील अल्फोंसा स्कूलच्या पाठीमागे दिवसाढवळ्या भर दुपारी हे गोळीबार झाल्याने परीसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे, हल्लेखोरांनी विजय ताड यांची इनोव्हा कार अडवून त्यांचा पाठलाग करत फायरिंग केले त्यामुळे त्यांचा जागेच मृत्यू झाला बघता बघता ही बातमी जत शहरात वाऱ्यासारखी पसरली तर घटनास्थळी हजारो लोक पाहण्यासाठी दाखल झाले. विजय ताड यांची झालेले ही हत्या राजकीय वैमनस्येतून झाली की अर्थिक देवाणघेवाणीतून झाली याबद्दल उलट सुलट चर्चा सुरू आहे या घटनेने जत पोलीस ठाण्याचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करून मृतदेह पोस्टमार्टम साठी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले रुग्णालय परिसरात ही त्यांचे चाहते मोठी गर्दी केले होते गोळीबार डोक्यात दगड घालून झालेल्या हत्यामुळे संपूर्ण तालुका हादरून गेला आहे .