समीर गांधी महाविद्यालयास वाणिज्य व विज्ञान शाखा सुरु करण्यास मान्यता

माळशिरस प्रतिनिधी/संजय हुलगे :

माळशिरस येथील श्री हनुमान शिक्षण प्रसारक संस्थेच्या समीर गांधी महाविद्यालयास बी .कॉम -भाग-१ (वाणिज्य )व बी .एस्सी .भाग-१ (विज्ञान व तंत्रज्ञान ) या दोन नवीन विद्याशाखा सुरु करण्यास शासनाकडून मंजुरी मिळाली असल्याची माहिती संस्थेचे जनरल सेक्रेटरी अड.मिलिंद कुलकर्णी यांनी दिली .यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष श्रीकांत पंचवाघ ,प्राचार्य देविदास गेजगे उपस्थित होते .
      श्री हनुमान शिक्षण संस्थेची स्थापना सन १९४७ मध्ये  वै.मारुतीनाना कुलकर्णी यांनी केली .त्यांनी सुरु केलेल्या संस्थेने वै .विष्णुपंत कुलकर्णी तथा अण्णाकाका यांच्या प्रयत्नातून मोठी भरारी घेतली असून सध्या या संस्थेत नर्सरी पासून कनिष्ठ महाविद्यालयात इंग्लिश ,सेमी इंग्लिश ,मराठी माध्यमातून सुमारे साडेतीन ते चार हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.ग्रामीण भागातील मुलीना उच्च शिक्षणासाठी पालक बाहेर पाठविण्यास धजावत नाहीत त्यांच्या शिक्षणाची सोय व्हावी यासाठी अण्णाकाकानी प्रयत्न करून तत्कालीन उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या माध्यमातून सन २००४ मध्ये कला महाविद्यालय सुरु केले .कला माध्यामाबरोबर वाणिज्य व विज्ञान शाखा सुरु करण्यासाठी जनरल सेक्रेटरी अड.मिलिंद कुलकर्णी हे प्रयत्न करीत होते त्यास आज यश आले असून शासनाने महाविद्यालयास बी .कॉम -भाग-१ (वाणिज्य )व बी .एस्सी .भाग-१ (विज्ञान व तंत्रज्ञान )  दोन नवीन विद्याशाखा सुरु करण्यास परवानगी मिळाली आहे .या दोन शाखा सुरु होण्याने शहर व परिसरातील ग्रामीण भागातील विद्यार्थी व विशेष करून विद्यार्थिनीना याचा फायदा होणार आहे .

अण्णाकाकांचे स्वप्न पूर्ण:श्रीकांत पंचवाघ
कला महाविद्यालया बरोबर वाणिज्य व विज्ञान शाखा सुरु करण्याचे स्वप्न अण्णाकाकांचे होते ते आता पूर्ण होत असल्याचे संस्थेचे कार्याध्यक्ष श्रीकांत पंचवाघ यांनी सांगितले .