महागाई विरोधात आटपाडी उद्या निषेध मोर्चा !

अरुणभाऊ वाघमारे, भारततात्या पाटील, हणमंतराव देशमुख नेतृत्व करणार
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी

भाजप सरकारने केलेल्या प्रचंड महागाई विरोधात काळ्या फिती लावून आटपाडी आज दि. २४ रोजी सकाळी १०.३० वाजता निषेध मोर्चा काढला जाणार असून आटपाडी तालुक्याचे तीन मातब्बर नेते श्री . अरुणभाऊ वाघमारे, श्री भारततात्या पाटील, श्री . हणमंतराव देशमुख या मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत.
वंचित बहुजन आघाडी व महाराष्ट्र राज्य सामाजीक न्याय हक्क विकास मंच आटपाडी यांच्या वतीने बहुजन चळवळीतले पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य नेते अरुणभाऊ वाघमारे यांच्या पुढाकाराने या मोर्चाचे नियोजन केले गेले आहे .
या मोर्चाच्या यशस्वीतेसाठी महागाईने त्रस्त झालेल्या नागरीक बंधू भगिनींनी हजारोंच्या संख्येने सामील व्हावे असे आवाहन ही या नेत्यांनी केले आहे .
अरुण कांबळे, राजेश गायगवाळे, साहेबराव चंदनशिवे, बाळासाहेब बनसोडे, डॉ. कुमार लोंढे, विलासराव खरात, भिमराव वाघमारे, श्रीरंगआण्णा कदम, शिवाजी जावीर, बळीआण्णा रणदिवे, अॅड धनंजय बाबर, सादिक खाटीक, आप्पा खरात, बाबुराव जाधव, आण्णासाहेब भोरे, इंजिनीयर अनिताताई पाटील, दादासाहेब कदम, आनंदराव ऐवळे, रविकांत सोहनी , भारत सोहनी, अमोल लांडगे, मारूती बुधावले, गणेश बुधावले, बाबु बुधावले, विजय मोटे, रामभाऊ मंडले इत्यादी अनेक मान्यवर या मोर्चात सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले .