ग्रामपंचायत निवडणुकांसाठी 2 डिसेंबरपर्यंत

नामनिर्देशनपत्र ऑफलाईन सादर करण्यास परवानगी
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
सांगली

ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी पारंपरिक पद्धतीने (ऑफलाईन) नामनिर्देशनपत्र सादर करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच नामनिर्देशनपत्र सादर करण्याची मुदत 2 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 5.30 पर्यंत वाढविण्यात आली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रकाव्दारे दिली आहे.राज्य निवडणूक आयोगाने 9 नोव्हेंबर 2022 रोजी ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यानुसार 28 नोव्हेंबर 2022 ते 2 डिसेंबर 2022 (दुपारी 3 वाजेपर्यंत) या कालावधीत संगणक प्रणालीद्वारे नामनिर्देशनत्र सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यात आता अंशत: दुरूस्ती करून नामनिर्देशनपत्र पारंपरिक (ऑफलाईन) पद्धतीने 2 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 5.30 पर्यंत सादर करता येतील, असेही राज्य निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रकारे कळविले