
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
उरण
उरण तालुक्यातील जसखार गावच्या पश्चिमेस चालू असलेल्या NHAI च्या महामार्गामुळे तेथील रस्त्यालगत असणाऱ्या वास्तूंना मोठ्या प्रमाणात नुकसान होत असताना सर्व ग्रामस्थांचा विरोध असूनदेखील सरकारी यंत्रणाला हाताशी धरून जे कंपंनीचे काम बिनधास्तपणे चालू आहे.ग्रामस्थांनी ग्रामपंचायत जसखार तसेच युवा सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून अनेक पत्रव्यवहार, आंदोलने करून शासकीय यंत्रणा यांना सदर कामामुळे उद्भवणाऱ्या अनेक समस्यांची जाणीव करून दिली. परंतु जे एन पी टी प्रशासन यांनी कोणतीही बाब गांभीर्यपूर्वक घेतली नाही.सतत ग्रामस्थांच्या मूलभूत प्रश्नाकडे दु्लक्ष केले आहे.याच नियोजनशून्य कारभारामुळे मागील आठवड्यात सदर कामाच्या ठिकाणी कै.कमलाकर विठ्ल ठाकूर आपल्या नातीला शाळेत दुचाकी घेऊन जात होते.ते जात असताना सदर ब्रीज महामार्गचे काम चालू असलेल्या ठिकाणी अपुऱ्या सुरक्षितता साधना अभावी त्याचा दुचाकी वरून अपघात झाला. त्यांच्या डोक्यास व पायाला गंभीर दुखापत झाली. व त्यांना एम जी एम हॉस्पिटल कामोठे येथे अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
सदर अपघाताची बातमी कळल्याबरोबर ग्रामपंचायतच्यावतीने सदर अपघातग्रस्त व्यक्तीला मेडिकल सुविधा व सदर महामार्गाचे ठेकेदार यांच्यांविरुद्ध गुन्हा दाखल करावा अशी मागणी ग्रामपंचायतच्या वतीने पोलीस प्रशासनाकडे करण्यात आली होती.परंतु जे एन पी टी किंवा ठेकेदार यांनी कोणतीही भूमिका घेतली नाही किंवा कोणत्याही प्रकारची मदत केली नाही.परिणामी अपघातग्रस्त नागरिक कमलाकर ठाकूर यांना हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत घोषित करण्यात आले.परिणामी त्यांच्या कुटुंबामध्ये शोककळा पसरली. जे एन पी टी च्या या नियोजनशून्य कारभाराचा सर्व स्तरावर निषेध व्यक्त होत आहे.जे एन पी टी प्रशासन आणखी किती निष्पाप नागरिकांचे बळी घेणार आहे? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडलेला आहे.म्हणून जे एन पि टी प्रशासन यांनी स्वर्गीय कमलाकर विठल ठाकूर यांच्यावर अवलंबून असणाऱ्या सर्व कुटुंब सदस्य यांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करून भविष्यातील या सर्व कुटुंबाची पालन पोषणची जबाबदारी स्वीकारावी व या दुर्घटनेतील दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी व सदर कुटुंबाला न्याय मिळावा अशी मागणी युवा सामाजिक संस्था जसखारचे सदस्य अमित ठाकूर यांच्या वतीने करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती