प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी
आटपाडी नगरपंचायतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. नगर विकास विभागाने याबाबत २० मे रोजीच्या शासन निर्णयानुसार सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथे नगरपंचायत स्थापन करण्याबाबत ही अधिसूचना काढली आहे. आटपाडी, मापटेमळा व भिंगेवाडी या गावांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे.
आटपाडी ग्रामपंचायतीत असलेले गावचे गट नंबर १ ते ३२८० व ३४०३ ते ४२१८ ,मापटेमळा ग्रामपंचायतीतील असलेले गावाचे गट नं.१ ते ६०४, भिंगेवाडी ग्रामपंचायतीत असलेल्या गावाचे गट नंबर १ ते १५५ हे आटपाडी नगरपंचायतीचे संक्रमणात्मक स्थानिक क्षेत्र आहे.
या संक्रमणात्मक क्षेत्रातील स्थानिक क्षेत्राच्या पूर्वेच्या हद्दीस बोंबेवाडी, खाणजोडवाडी, यपावाडी गावची हद्द, पश्चिमेस मुढेवाडी, बनपुरी या गावची हद्द व शेंडगेवाडीवस्ती आटपाडी गट नंबर ३२८१ ते ३४०२, दक्षिणेस तडवळे, मासाळवाडी, बनपुरी गावची हद्द व उत्तरेस गळवेवाडी, पिसेवाडी, आवळाई, शेरेवाडी पुजारवाडी(आटपाडी), देशमुखवाडी गावची हद्द असा हद्दीचा तपशील आहे.

संबंधित बातम्या
‘मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया’च्या पुणे विभागीय संघटन सहसचिवपदी लक्ष्मणराव खटके
प्रगल्भनायक दि.22/08/2023 रोजीचा अंक
प्रगल्भनायक दि.21/08/2023 रोजीचा अंक