अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
जत
साळमळगेवाडी (ता.जत) येथे वादळी वाऱ्याने तुटलेल्या विजेच्या तारेला धक्का लागून वृध्द महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. राजमाबी पिरसाब शेख (वय 60, रा. साळमळगेवाडी, ता.जत) असे मृत वृध्देचे नाव असून शुक्रवारी दि. १३ मे रोजी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना निदर्शनास आली. याबाबत जत पोलिस ठाण्यात रात्री सफरफराज बाबासाहेब शेख (रा. साळमळगेवाडी, ता.जत) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, राजमाबी शेख ह्या दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास शेळ्या चारण्यासाठी शेतात गेल्या होत्या. दुपारी घरापासून काही अंतरावर असलेल्या खांडेकर यांच्या शेतात काल वादळी वाऱ्याने डांबावरील मुख्य तार तुटतून झाडावर लटकत होती. याच तारेचा धक्का राजमाबी यांना लागला. यातच त्याचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर सायंकाळी ३.३० वाजण्याच्या सुमारास खांडेकर यांच्या शेतातील लोकांनी ही घटना पाहताच राजमाबी यांच्या कुटुंबाला याची माहिती दिली. शिवाय, तारतंत्रीला बोलावून मुख्य वाहिनीचा विद्यूत पुरवठा खंडित केला. मृतदेह सायंकाळी ८.०० वाजता शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठविण्यात आला. या घटनेची रात्री उशिरापर्यंत जत पोलिस ठाण्यात नोंद झालेली नव्हती.

संबंधित बातम्या
औषध विक्री दुकानांत सीसीटीव्ही बसवण्याचे आवाहन
सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी वाढीव निधी देऊ – उपमुख्यमंत्री अजित पवार
दहिवडी न्यायालयाच्या वतीने राष्ट्रीय लोकअदालतीचे यशस्वी आयोजन