आटपाडी तालुक्यात जलजीवन पाणीपुरवठा योजनेचा आ.गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते शुभारंभ!


प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /आटपाडी:
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील केंद्र शासनाच्या जल जीवन-पाणीपुरवठा योजनेचा आटपाडी पंचायत समितीमार्फत सुरु झाली.या योजनेचा शुभारंभ आमदार गोपीचंद पडळकर यांचे हस्ते व सभापती सौ.पुष्पाताई जयवंत(भाऊ) सरगर प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
आटपाडी तालुक्यातील माळेवाडी व भिंगेवाडी येथे जल जीवन – पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन आमदार गोपीचंद पडळकर व युवा नेते जयवंत(भाऊ) सरगर यांचे हस्ते करण्यात आले.
यावेळी युवा नेते अनिलशेठ पाटील,जि.प सदस्या वंदनाताई गायकवाड, उपसभापती दादासाहेब मरगळे, आटपाडी तालुक्याचे युवानेते प्रभाकर पुजारी, भाजपा तालुकाध्यक्ष उमाजी सरगर, सुरज गायकवाड, माळेवाडी व भिंगेवाडी गावचे सरपंच,उपसरपंच,ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
तसेच युवा नेते अनिल सूर्यवंशी,करगणी गावचे युवा नेते व ग्रामपंचायत सदस्य पिंटू सरगर, कॉन्ट्रॅक्टर नाथा सरगर, संभाजीराव काळे,नवनाथ सरगर, जीवन कासार, नवनाथ पाटील आदि मान्यवरांच्या उपस्थितीत आटपाडी तालुक्यातील जनजीवन पाणी – पुरवठा योजनेचा शुभारंभ करण्यात आला.
या योजनेमुळे आटपाडी तालुक्यातील गावांना तसेच गावातील प्रत्येक घराला पिण्याचे पाणी मिळणार आहे.त्यामुळे आटपाडी पंचायत समितीच्या सभापती सौ पुष्पाताई जयवंत(भाऊ) सरगर यांनी जलजीवन योजनेचे काम चांगल्या प्रकारे करून आटपाडी तालुक्याचे नाव महाराष्ट्र राज्यात लौकिक केले. त्याबद्दल आमदार गोपीचंद पडळकर यांनी सभापती यांचे अभिनंदन केले. तसेच जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाचे माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर, आटपाडी पंचायत समितीचे माजी सभापती हर्षवर्धन देशमुख ,जि.प.सदस्य अरुण बालटे,जि. प.सदस्या सौ.वंदना गायकवाड, जि.प.सदस्य मोहन रणदिवे आदि जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांनी चांगल्याप्रकारे पंचायत समिती व जिल्हा परिषदेचे काम करून प्रत्येक गावात विकासात्मक कामे देऊन योजना राबविल्याबद्दल त्यांचेही आमदार गोपीचंद पडळकर यांनी अभिनंदन केले.