जत येथे ठिकठिकाणी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क / जत :

जत येथे भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
तहसिलदार कार्यालयात जतचे उपविभागीय अधिकारी जोगेंद्र कट्यारे यांच्याहस्ते शासकीय ध्वजारोहन कार्यक्रम पार पडला.
यावेळी जतचे आमदार विक्रमसिंह सावंत, तहसिलदार जीवन बनसोडे, गटविकास अधिकारी दिनकर खरात, जत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश वाघमोडे, नितीन शिंगाडे, जत पंचायत समितीचे सभापती मनोज जगताप,जतचे मंडल अधिकारी संदिप मोरे, तलाठी रविंद्र घाडगे, आर.पी.आय. जिल्हाध्यक्ष संजय कांबळे, जत नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष आप्पासाहेब पवार, नगरसेवक स्वप्निल शिंदे, परशुराम मोरे, युवराज निकम,इराण्णा निडोनी, निलेश बामणे, एच.एम.मुजावर, आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले, पोलीस निरीक्षक उदय डुबल व पोलीस कर्मचारी यांनी ध्वजास मानवंदना दिली.
जत येथील दुय्यम निबंधक कार्यालयात दुय्यम निबंधक सुनिल पाथरूट यांच्याहस्ते ध्वजारोहन करण्यात आले. भूमिअभिलेख कार्यालय जत येथे उपअधिक्षक सुनिल लाळे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी भूमिअभिलेख कार्यालय यांच्यावतीने तालुक्यातील सेवानिवृत्त लष्करी अधिकारी व लष्करी जवानांचा सन्मान करण्यात आला.
जत शहरासह तालुक्यात विविध शासकीय कार्यालयात, वित्तीय व शैक्षणिक संस्था आदि ठिकाणी मोठ्या उत्साहात ध्वजारोहन कार्यक्रम पार पडला.