
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/सांगली :
महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे गुरूवार दिनांक ९ सप्टेंबर रोजी सांगली जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.
त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे:
गुरूवार दिनांक ९ सप्टेंबर रोजी
सकाळी ८.०० वा राजभवन मुंबई येथून प्रयाण. सकाळी ८.३० वा. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे आगमन व राखीव.
सकाळी ८.४५ वा.शासकीय विमानाने कोल्हापूरकडे प्रयाण.
सकाळी ९.४५ वा. कोल्हापूर विमानतळ येथे आगमन व राखीव.
सकाळी १०.०० वा.शासकीय मोटारीने सांगलीकडे प्रयाण.
सकाळी ११.०० वा. सर्किट हाऊस माधवनगर रोड, सांगली येथे आगमन व राखीव.
सकाळी ११.२० वा. सर्किट हाऊस माधवनगर रोड, सांगली येथून कसबे डिग्रजकडे प्रयाण.
सकाळी ११.३० वा. दिपलक्ष्मी मंगल कार्यालय, कवठेपिरान रोड कसबे डिग्रज सांगली येथे आगमन व दिपाली भोसले सय्यद धर्मादाय संस्थेमार्फत आयोजित सामुदायिक विवाह सोहळ्यात, पूरामुळे बाधित कुटुंबातील एक हजार मुलींना पन्नास हजार रूपयांच्या मुदत ठेवीच्या प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमास उपस्थिती.
दुपारी १२.३० वा. दिपलक्ष्मी मंगल कार्यालय, कवठेपिरान रोड कसबे डिग्रज येथून सांगलीकडे प्रयाण.
दुपारी १२.४० वा. सर्किट हाऊस माधवनगर रोड, सांगली येथे आगमन व राखीव.
दुपारी २.०० वा. सर्किट हाऊस माधवनगर रोड, सांगली येथून मोटारीने कोल्हापूरकडे प्रयाण.
दुपारी ३.०० वा. कोल्हापूर विमानतळ येथे आगमन व राखीव.
दुपारी ३.१५ वा. शासकीय विमानाने मुंबईकडे प्रयाण.

संबंधित बातम्या
औषध विक्री दुकानांत सीसीटीव्ही बसवण्याचे आवाहन
सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी वाढीव निधी देऊ – उपमुख्यमंत्री अजित पवार
दहिवडी न्यायालयाच्या वतीने राष्ट्रीय लोकअदालतीचे यशस्वी आयोजन