मोहनराव पुजारी
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी:
आटपाडी तालुका विधी सेवा समिती यांच्यावतीने दिवाणी व फौजदारी न्यायालय क स्तर आटपाडी येथे राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन करण्यात आले.
या लोक अदालतमध्ये ३६ फौजदारी प्रकरणे, १३ दिवाणी प्रकरणे व ५ वादपूर्व प्रकरणे अशी एकूण ५४ प्रकरणे निकाली करण्यात आली. या प्रकरणांमधून एकूण १२ लाख,४५ हजार,७०३₹ एवढी रक्कम वसूल करण्यात आली.
आटपाडी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे न्यायाधीश मा.ए.आर. टेंगसे यांनी लोकअदालत कामी पॅनल प्रमुख म्हणून काम पाहिले. अॅड.एम.एम.मोरे यांनी पॅनल मेंबर व अरविंद चांडवले यांनी सामाजिक कार्यकर्ते तर ए.एम. जमादार यांनी विधी सेवा समितीचे व्यवस्थापक म्हणून काम पाहिले.

संबंधित बातम्या
औषध विक्री दुकानांत सीसीटीव्ही बसवण्याचे आवाहन
सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी वाढीव निधी देऊ – उपमुख्यमंत्री अजित पवार
दहिवडी न्यायालयाच्या वतीने राष्ट्रीय लोकअदालतीचे यशस्वी आयोजन