सांगलीत मुख्यमंत्री ‘असे’ बोलले…

सांगली येथे पूर परिस्थितीची आढावा बैठक घेऊन नंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यातील महत्वाचे मुद्दे:
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/सांगली :
आपत्तीची वारंवारता पाहिली तर त्यांचे स्वरूप भीषण होतेय, प्रचंड प्रमाणात पाऊस, दरडी खचताहेत, निसर्गासमोर हतबलता असते.
पुराच्या पाण्यामुळे पूल वाहून गेले, घाट रस्ते खचले.
नदी पात्रातल्या पूर रेषेची अंमलबजावणी होत नसेल तर त्यांना काय अर्थ?
अतिक्रमणे झाली आहेत.
काही ठिकाणी वस्त्यांचे पुनर्वसन करावे लागेल मग दरडग्रस्त ठिकाणे असतील,बांधकामे देखील दूर करावी लागतील नाईलाजाने!
दोन गोष्टींवर आपल्याला काम करावे लागेल. आपत्तीग्रस्तांना तात्काळ मदत करणे सुरु झाले आहे.
सांगली प्रशासनाला नागरिकांनी चांगले सहकार्य केले, या संपूर्ण भागात काही लाख लोकांचे स्थलांतर झाले, जीव वाचले.
कायमस्वरूपी तोडगा काढणे अत्यंत महत्वाचे आहे.
पुराच्या पाण्याचे व्यवस्थापन करणे महत्वाचे. दुष्काळग्रस्त भागाकडे पाणी वळवण्याचा सूचना देखील आल्या आहेत.
वडनेरे समितीसह सर्व समित्यांचे अहवाल एकत्र करून योग्य तो आराखडा करण्यात येईल.
तज्ज्ञांची समिती नेमण्याची गरज. त्यात पूर व्यवस्थापन, दरडी का कोसळतात या अनूषंगाने उपाय शोधण्यात येतील.
यापुढे विकास कामे करताना होणारा फायदा व नंतर निसर्ग , पर्यावरण या अनुषंगाने भविष्यातील होणारा तोटा याचा विचार करावा लागेल.
आम्ही मागणी केली आहे. केंद्राने आता एनडीआरएफचे निकष सुधारावेत, व्यावसायिक, व्यापारी यांना विम्याची रक्कम महसूल विभागाच्या पंचनाम्यावर मिळावेत.
सहाही जिल्हे पूर परिस्थितीपूर्वी कोरोनाशी लढताहेत.
सांगली परिसरात चाचणी वाढवा असे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.
नागरिकांचे जीव वाचविणे माझ्या दृष्टीने महत्वाचा आहे.
राज्यात आज १२५० ते १३०० मेट्रिक टन ऑक्सिजन आपण दररोज उत्पादन करवतो,पण मध्यंतरी ऑक्सिजनचा इतका तुटवडा !
पुढची जी लाट आहे त्यात केंद्राने देखील आपल्याला निर्देश दिले आहेत. या संभाव्य लाटेत दुपटीपेक्षा जास्त ऑक्सिजन लागेल. मला विनंती करायची आहे कि प्रत्येकाने बाहेर पडताना मास्क घालणे.
रुग्ण वाढ कमी होत नाही, तिथे दुकानांच्या वेळांवर बंधने राहतील. इतर ठिकाणी दुकानांच्या वेळा रात्री ८ पर्यंत वाढवतो आहोत.
लोकलच्या बाबतीत आपण लगेच निर्णय घेत नाही आहोत.
सर्व ठिकाणच्या कार्यालय प्रमुखांना कामाच्या वेळा विभागण्याची विनंती करतो आहे. वर्क फ्रॉम होमचे नियोजन करा.
उद्योगांना शक्य आहे, तिथे बायो बबल करणे, व आरोग्याचे नियम पाळून सुरक्षितरित्या उत्पादन कसे करता येईल याचा विचार करावा.