‘या’ ७४ रस्त्यांची वाहतूक बंद!

जिल्ह्यात पूर व अतिवृष्टीमुळे 74 रस्त्यावरील वाहतूक बंद
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/सांगली :
जिल्ह्यात पावसामुळे, पुरामुळे व इतर कारणामुळे आत्तापर्यंत शिराळा, मिरज, वाळवा, पलूस व कडेगाव तालुक्यांमधील एकूण 74 रस्त्यावरील वाहतूक खंडीत, बंद पडलेली आहे. काही ठिकाणी पर्यायी मार्गावरून वाहतूक सुरू आहे.
पावसामुळे, पूरामुळे व इतर तत्सम कारणांमुळे (उदा. पूल बुडीत होणे, पूलाचा भराव खचणे इ.) वाहतुक खंडित/बंद पडलेल्या रस्त्याचा तपशील पुढीलप्रमाणे.
शिराळा तालुका – मांगले सावर्डे रस्ता बंद पर्यायी मार्ग मांगले चिकुर्डे पुलावरुन कांदे सावर्डे पुलावरुन वाहतूक सुरु, चरण पथ वारुणी बुरभुशी रस्ता बंद असून पर्यायी मार्ग नाही, बिळाशी भेडसगाव रस्ता बंद असून पर्यायी मार्ग कोकरुड, मलकापूर राज्य मार्गावरुन वाहतूक सुरु, प्रजिमा 1 ते सुजयनगर रस्ता बंद असून पर्याय मार्ग नाही, भाडूगळेवाडी, येसलेवाडी, गुंडगेवाढी, खोतवाडी, काशिदवाडी, चिंचेवाडी, खराळे, काळुंद्रे ते रा.मा. क्र. 158 मिळणारा रस्ता बंद असून पर्यायी मार्ग नाही.
मिरज तालुका – समडोळी कोथळी रस्ता बंद असून पर्यायी रस्ता सांगली मार्गे वाहतूक सुरू, नांद्रे-ब्रम्हनाळ रस्ता बंद असून पर्यायी वाहतुक नांद्रे – वसगडे मार्गे सुरु, नांद्रे मौजे डिग्रज रस्ता बंद असून पर्यायी वाहतुक कवठेएकंद-वसगडे मार्गे सुरु, पद्माळे-कर्नाळ रस्ता बंद असुन पर्यायी वाहतूक पद्माळे सांगली मार्गे सुरु, कवलापूर-कवठेएकंद रस्ता बंद असुन पर्यायी वाहतुक तासगाव – सांगली मार्गे सुरु आहे. अंकली – मळीभाग रस्ता बंद असून पर्यायी वाहतुक सांगली कोल्हापूर रस्त्यावरुन सुरु आहे. कसबे डिग्रज-समडोळी-दानोळी रस्ता बंद असून पर्यायी वाहतुक बागणवाट रस्त्यावरुन सुरु आहे.
वाळवा तालुका – कासेगाव-काळम्मवाडी-केदारवाडी-साखराळे-खेडपुणदी रस्ता बंद असून पर्यायी रस्ता नाही. पेठ- महादेववाडी-माणिकवाडी-वाटेगाव रस्ता बंद असून पर्यायी वाहतुक ग्रा.म.14 वरुन सुरु आहे. रा.मा. क्र. 150 ते गौंडवाडी-मसुचीवाडी-खेड-वाळवा- आष्टा रस्ता बंद असून पर्यायी वाहतुक प्रजिमा 28 व राज्य मार्ग 150 वरुन सुरु आहे. बहे – नेर्ले रस्ता बंद असुन पर्यायी वाहतुक प्रजिमा-142 वरुन सुरु आहे. बहे नेर्ले रस्ता बंद असून पर्यायी वाहतूक प्रजिमा 142 रस्यास्वरून सुरू. खरातवाडी बहे रस्ता बंद असून पर्यायी वाहतूक प्रजिमा 22 व रा.मा.क्र. 158 वरून सुरू. खरातवाडी रेठरे हरणाक्ष् रस्ता बंद असून पर्यायी मार्ग नाही. राममा. 4 ते येलूर कुरळप मांगले रस्ता बंद असून प्रजिमा 115 रस्यारूवरून सुरू. कार्वे केदारवाडी डोंगरवाडी ठाणापूडे ते जिल्हा हद्द रस्ता बंद असून पर्यायी मार्ग नाही. बणेवाडी रस्ता बंद असून पर्यायी वाहतुक ग्रा.मा. 354 रस्त्यावरुन सुरु आहे. शिरगाव – नागठाणे रस्ता बंद असून पर्यायी मार्ग नाही. इजिमा क्र. 43 ते कनेगाव-भरवाडी रस्ता बंद असून पर्यायी मार्ग नाही. इजिमा क्र. 29 ते पेठ-गोळेवाडी रस्ता बंद असून पर्यायी वाहतुक राज्य मार्ग क्रमांक 150 वरुन सुरु आहे. इजिमा. 35 शिरगाव नागराळे रस्ता बंद असून पर्यायी मार्ग नाही. तुकाईखडी रस्ता बंद असून पर्यायी वाहतूक प्रजिमा क्र.4 व रा.मा. क्र. 158 वरून सुरू आहे. कासेगाव ते कृष्णाघाट स्मशानभूमी पर्यंत रस्ता बंद असून पर्यायी रस्ता नाही. शिरगाव रस्ता बंद असून पर्यायी रस्ता नाही. नेर्ले ते बोरगाव रस्ता बंद असून पर्यायी वाहतूक इजिमा क्र. 27 व प्रजिमा क्र. 142 वरून सुरू आहे. शिरगाव स्मशानभूमी रस्ता बंद असून पर्यायी मार्ग नाही. शिगाव नारायण मळा ते फरणेवाडी रस्ता बंद असून पर्यायी मार्ग नाही. रामा. 150 ते वंजारीमळा ते गौडवाडी रस्ता बंद असून पर्यायी वाहतूक इजिमा क्र. 27 व प्रजिमा क्र. 142 वरून सुरू आहे. देसाईमळा ते मुलाणवाडी (रेठरेहरणाक्ष) रस्ता बंद असून पर्यायी रस्ता नाही. ऐतवडे खुर्द पारगांव पाणंद रस्ता बंद असून पर्यायी रस्ता नाही. ऐतवडे खुर्द पारगाव पाणंद रस्ता बंद असून पर्यायी मार्ग नाही. प्रजिमा 22 देसाईमळा बोरगाव रस्ता बंद असून पर्यायी रस्ता नाही. देसाईवस्ती ते मुलाणी वस्ती रेठरेहरणाक्ष रस्ता बंद असून पर्यायी रस्ता नाही.
पलूस तालुका – पलूस तालुक्यातील पुढील रस्ते बंद असून पर्यायी मार्ग नाही. तुपारी मार्ग ते रामा.142 रस्ता, भिलवडी सुखवाडी रस्ता, रामा.158 ते आमणापूर माळीवस्ती रस्ता, प्रजिमा 16 ते आमणापूर बोरजाईनगर रस्ता, भिलवडी ते औदूबंर रस्ता, अजिमा.85 ते भिलवडी महाविरनगर हायस्कूल अप्रोच रस्ता, अंकलखोप बावचघाट ते सुभाषनगर रस्ता, भिलवडी हरिजनवस्ती रस्ता, खटाव माळवाडी रस्ता, भिलवडी माळवाडी रस्ता, बोरजाई नगर ते राडेमळा रस्ता, खटाव सटवाई रस्ता, नागराळे बुर्ली (चौगुलेनगर) रस्ता, अंकलखोप ते म्हसोबा देवालय रस्ता, रामा.151 पासून भास्कर चौगुले ते पतंग सुर्यवंशी वस्ती रस्ता, इजिमा. 84 खोलेवाडी ते पोल्ट्री फार्म मार्गे रामा.151 ला मिळणारा रस्ता, नागठाणे खोलेवाडी मळीभाग रस्ता, राडेवाडी औंदुबर रस्ता, कुंडल शेरे दुधोंडी रस्ता, नागराळे नागठाणे नदीकाठचा रस्ता, पुणदी जाधवमळा इनामपट्टा रस्ता, बुर्ली मुकुंदनगर रस्ता, अंकलखोप रामानंदनगर रस्ता, आमणापूर बुर्ली (वन मार्ग) रस्ता, आमणापूर आुगडेवाडी रस्ता, अंकलखोप ग्रामपंचायत पासून बिरोबा देवालय रस्ता, बुर्ली नलवडेवस्ती रस्ता, बुर्ली नळवाडी (पदाप्वावस्ती) रस्ता, घोगांव पाणंद रस्ता, राडेवाडी सावंतवस्ती रस्ता, सुखवाडी भोरेवस्ती (भटकी रस्ता) रस्ता, भिलवडी पाणंद रस्ता, दुधोंडी नागराळे चौगुलेनगर ते प्रजिमा. 32 पर्यंत रस्ता, अंकलखोप वैभवनगर राडेवाडी खोलेवाडी (सुर्यनगर) पर्यंत रस्ता, रामा.142 पासून घोगांव दुधोंडी प्रजिमा.36 पर्यंत रस्ता, मोराळे सांडगेवाडी आुगडेवाडी तावदरवाडी हजारवाडी ते रामा.51 ला मिळणारा रस्ता, रामापूर कुंडल नागराळे रस्ता.
कडेगाव तालुका – आसद चिंचणी रस्ता बंद असून पर्यायी मार्ग आसद मोहितेवडगांव व आसद पाडळी रस्त्यावरुन वाहतूक सुरु आहे.