दुष्काळमुक्तीला चेकडॅम ठरणार वरदान:आ.विक्रमसिंह सावंत

मुचंडी सिध्दनाथ,पांढरेवाडी,संख येथे बंधाऱ्यांचे भूमिपूजन


अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:

जत तालुका अवर्षणप्रवण क्षेत्रात असल्याने येथे पडणाऱ्या प्रत्येक पावसाचा थेंब न् थेंब अडवला पाहीजे . यासाठी जलसंधारणाला अधिक महत्व द्यावे लागेल .तालुका शंभर टक्के सिंचनाखाली आणण्यसासाठी सतत प्रयत्न सुरु आहेत .त्याच सोबत जलसंधारणाच्या कामालाही आपण प्राधान्य दिले आहे .आज जत पूर्व भागात होत असलेल्या नऊ चेकडॅममुळे दुष्काळमुक्तीला साथ मिळणार आहे,असे प्रतिपादन जतचे आमदार विक्रमदादा सावंत यांनी केले.
जत तालुक्यात मृद व जलसंधारण विभागामार्फत मंजूर झालेल्या नऊ चेकडॅमचे उद्घाटन आमदार विक्रमसिंह सावंत यांच्याहस्ते करण्यात आले . यावेळी ते बोलत होते.
यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आप्पाराया बिराजदार,कार्याध्यक्ष सुजय(नाना) शिंदे , जि.प.सदस्य सरदार पाटील , नगरसेवक भूपेन्द्र कांबळे ,माजी सभापती बाबासाहेब कोडग , मारुती पवार , मुचंडीचे सरपंच अशोक पाटील, प्रकाश पांढरे , एम. आर.जिगजेणी , साहेबगौड़ा पाटील, हणमंतराव बिराजदार, जालिंदर व्हनमाने, तसेच पदाधिकारी, जिल्हा जलसंधारण अधिकारी विनायक खरात ,उपविभागीय जलसंधारण अधिकारी जगधीश मेटकरी ,शाखा अभियंता जलसंधारण विभाग शरद सुतार आदी उपस्थित होते .
आ.सावंत पुढे म्हणाले,जत तालुका शंभर टक्के सिंचनाखाली आणण्याचा शब्द आपण निवडणुकीत दिला आहे . त्याची फलश्रुती आपणाला दिसते आहे . आज म्हैसाळ योजनेला दोन वर्षात मोठ्या प्रमाणात गती दिली . त्यामुळे इकडे उमदीपर्यंत पाणी आले आहे .आवंढी , तसेच देवनाळ भागातही पाणी पोहचले आहे . येणाऱ्या आवर्तनापर्यंत म्हैसाळ योजना शंभर टक्के कार्यन्वीत करण्याचे नियोजन केले आहे . यासाठी राज्याचे जलसंपदामंत्री जयंतराव पाटील , कृषीराज्य मंत्री विश्वजीत कदम यांनी ही मोठे सहकार्य केले आहे .
दरम्यान , तालुक्याच्या पूर्व भागातील वंचित गावांसाठी आपण तुबची योजनेतून पाणी देण्याची मागणी महाराष्ट्र कर्नाटक सरकारकडे केली आहे . कर्नाटक देखील सकारात्मक आहे . तसेच राज्य शासन विस्तारीत योजना करणार आहे . कोणत्या का असेना पण जतला पाणी मिळावे या मागणीसाठी सतत पाठपुरावा करत असून , यात कुठेही कमी पडणार नाही . एकीकडे जतच्या सिंचनाचा विषय गंभीर असल्याने मी सातत्याने संघर्ष करत आहे . परंतु आज ही विरोधक शांत बसायला तयार नाहीत . चांगल्या कामाला खो घालायचा, चुकीचा संदेश लोकांत पसरवायचा हा उद्योग सुरू आहे.
विरोधकांना काही करायचे नसेल तर किमान चांगल्या कामाला विरोध करू नये,अशी भूमिका आम्ही सतत मांडत आलो आहोत . त्यामुळे सतत त्यांच्या टीकेला , चुकीच्या आरोपांना उत्तर देण्यात रस वाटत नाही . जत तालुक्यातील जनतेला माझ्या कामावर पूर्ण विश्वास आहे . एकीकडे कोरानामुळे सबंध राज्य अडचणी असतानासुध्दा जतच्या विकासाला चांगली गती देण्याचे काम सुरू आहे , असेही आ . सावंत यांनी स्पष्ट केले .
चेकडॅम ठरणार वरदान
आ .सावंत म्हणाले , आज मुचंडी येथे सहा तर सिध्दनाथ , संख , पांढरेवाडी येथे चेकडैम मंजूर केले आहेत . मुचंडी भागातील डॅममुळे ५१४.५७ सघमी पाणीसाठी उपलब्ध होणार असून , १८२ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे . या कामावर ७१४.१० कोटी रुपये खर्ची होणार आहेत . तसेच संख नाटेकरवस्ती येथे ११५.५० कोटी पांढरेवाडी लेंगरेवस्ती येथे ११०.५९ कोटी रूपये , सिद्धनाथ बिदरीवस्ती येथे ९७.९५ लाख रूपये खर्च करून हे बंधारे होत आहेत .असे एकूण १०३८.१४ कोटी एकता निधी दुष्काळमुक्तीसाठी या बंधाऱ्यांचा फायदा होणार आहे .