जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त 15 जुलैला ऑनलाईन मार्गदर्शन वेबीनार :सहायक आयुक्त ज. बा. करीम
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/सांगली :
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सांगली यांच्यामार्फत जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त नोकरी व स्वयंरोजगार इच्छुक उमेदवारांसाठी दि. 15 जुलै 2021 रोजी सकाळी 11.30 ते दुपारी 12.30 या वेळेत ऑनलाईन मार्गदर्शन वेबीनार आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास चे सहायक आयुक्त ज. बा. करीम यांनी दिली.
ऑनलाईन वेबीनारमध्ये जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त कौशल्य विकास कार्यक्रमाची माहिती व मार्गदर्शन या विषयावर जिल्हा कौशल्य विकास समन्वयक आसिफ जमादार व कौशल्य विकास मार्गदर्शन अधिकारी आ. बा. तांबोळी हे मार्गदर्शन करणार आहेत. इच्छुक युवक व युवतींनी meet.google.com/coi-bgqy-bni या लिंकवर वेबिनारमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन श्री. करीम यांनी केले आहे.

संबंधित बातम्या
औषध विक्री दुकानांत सीसीटीव्ही बसवण्याचे आवाहन
सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी वाढीव निधी देऊ – उपमुख्यमंत्री अजित पवार
दहिवडी न्यायालयाच्या वतीने राष्ट्रीय लोकअदालतीचे यशस्वी आयोजन