न्याय मागण्यांसाठी तमाशा कलावंतांचे एकदिवसीय उपोषण

शिवाजी ओलेकर
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/कवठेमंहाकाळ:

कवठेमहांकाळ तालुक्यामधील सर्व तमाशा कलावंत व उमा बाबाजी हंगामे तमाशा कलाकार संघटना सांगली यांच्यावतीने कवठेमहांकाळ तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मनोरंजनाचे कार्यक्रम रद्द झाले. पाचपेक्षा अधिक लोकांनी एकत्र येऊ नये ,यासाठी जत्रा रद्द करण्यात आल्याने तमाशाचे कार्यक्रम बंद पडले. त्यामुळे गेले दीड वर्षे या कलाकारांना उपासमारी सहन करावी लागत आहे. शासनाने एका नव्या पैशाचीही मदत केली नसल्याने, याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज 06 जुलै रोजी तमाशा कलाकार संघटना सांगली, संस्थापक अध्यक्ष भास्कर सदाकळे यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. कलावंतांना दरमहा 5000 रुपये देऊ करावे, अशा कलाकारांच्या मागणीचे निवेदन तहसीलदार बी.जे.गोरे यांना देण्यात आले.
सर्व तमाशा कलाकारांना शासनाने मदत करावी अशी कलाकार वर्गामध्ये चर्चा जोर धरत आहे. तरी ही बाब लक्षात घेता संबंधित प्रशासनाने कलाकारांकडे लक्ष द्यावे, असे तमाशा कलाकार म्हणत आहे.यावेळी पोलिस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस कॉस्टेबल प्रताप देसाई यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
यावेळी उपस्थित कलाकार उमा बाबाजी हंगामी तमाशा कलाकार संघटना सांगली संस्थापक अध्यक्ष भास्कर सदाकळे, सांगली जिल्हा अध्यक्ष मंगेश सकट, जिल्हा उपाध्यक्ष आगर नागरकर, कवठेमहांकाळ तालुका अध्यक्ष रुबाब सौंदडे, तासगाव तालुका अध्यक्ष लंका कांबळे अर्थात लंका पाचेगावकर,कवठेमहांकाळ सचिव तानाजी लोखंडे, छाया वाघमारे, सदाशिव सौंदडे आदी लोककलावंत या आंदोलनात सहभागी झाले होते.

संबंधित बातम्या
औषध विक्री दुकानांत सीसीटीव्ही बसवण्याचे आवाहन
सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी वाढीव निधी देऊ – उपमुख्यमंत्री अजित पवार
दहिवडी न्यायालयाच्या वतीने राष्ट्रीय लोकअदालतीचे यशस्वी आयोजन