प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/मुंबई:
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना एनयुजे इंडिया,नवी दिल्ली शी संलग्न असणार्या नॅशनल युनियन ऑफ जर्नलिस्ट्स महाराष्ट्र चे वतीने एनयुजेचे ज्येष्ठ नेते शिवेंद्रकुमार यांचे मार्गदर्शनाखाली आज माध्यमकर्मीचे ज्वलंत समस्यांबाबतची निवेदने देण्यात आली. मागील वर्षभरात प्रसारमाध्यमकर्मी अनेक समस्यांनी त्रस्त आहेत.या कोंडीतून मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व महाविकास आघाडी सरकारने मार्ग काढून चौथ्या स्तंभाला बळकटी द्यावी अशी विनंती या निवेदनासोबत केली आहे.1)महाराष्ट्रातील सर्व प्रसारमाध्यमातील कार्यरत पत्रकार व पत्रकारेत्तर कर्मचारी यांना कोरोना आपत्कालीन काळात कोविड योद्धा म्हणून 50 लाखाचे वीमा संरक्षण मिळावे. औषधोपचारासाठी सहकार्य व्हावे. 2)कोरोनाविरूद्घ लढाईत अत्यावश्यक सेवेत असणारे पत्रकार व पत्रकारेत्तर कर्मचारी व त्यांचे कुटुंबीयांसाठी प्रत्येक जिल्हात हॉस्पिटलमध्ये 15 खाटा सर्व आरोग्य सुविधांसह राखीव ठेवणे!3)असंघटित कामगार म्हणून श्रमिक पत्रकार व पत्रकारेत्तर कर्मचारी यांचेसाठी स्वतंत्र महामंडळ गठीत करणे.4) पत्रकार व पत्रकारेत्तर कर्मचारी यांची श्रमिक पत्रकार व पत्रकारेत्तर कर्मचारी म्हणून रजिस्ट्रेशन होणे.5)पत्रकारितेत 10 वर्षाहून अधिक काम केलेल्या पत्रकार व पत्रकारेत्तर कर्मचाऱ्यांना (ते अधिस्वीकृतीधारक नसले तरीही) अधिस्वीकृतीधारकाप्रमाणे सर्व सुविधां मिळणे(आरोग्य,प्रवास आदी सवलती!) याबाबतची निवेदने पुन्हा एकदा देण्यात आली आहेत! तसेच डॉ नीलमताई गोर्हे ,उपसभापती विधानपरिषद महाराष्ट्र यांनाही याबाबत सहकार्यासाठी निवेदने दिली आहेत अशी माहिती सरचिटणीस सीमा भोईर यांनी दिली. कालच एनयुजे इंडिया,नवी दिल्ली चे वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना देशभरातील अत्यावश्यक सेवेतील फ्रंटलाईन वर्कर्स म्हणून पत्रकारांना कोरोना योद्धा म्हणून जाहीर करून आर्थिक सहकार्य,आरोग्यविषयक सर्व सुविधा मिळणेबाबत निवेदन देण्यात आले.एनयुजे चे राष्ट्रीय अध्यक्ष रासबिहारीजी यांनी या निवेदनात , “अनेकांच्या नोकऱ्या गेल्या असून छोटे पेपर, मध्यम पेपर ,साप्ताहिकात, छोटे चॅनल्स यांची अवस्था बिकट आहे.अनेक पत्रकार या संकटात आपले औषधोपचारही करू शकत नाहीत. अशा स्थितीत केंद्र व राज्य सरकार यांनी पत्रकारांना सहकार्य करण्याची,कोरोना योद्धा दर्जा देणेची” विनंती केली आहे. आज एनयुजेमहाराष्ट्र चे वतीने महाराष्ट्रातील पत्रकार व पत्रकारेत्तर कर्मचारी यांना कोरोना योद्धा म्हणून मान्यता देऊन कोरोना आपत्कालीन स्थितीत बाधित झालेल्यांना उपचारासाठी मदत आणि बाधित होऊन मृत्यूमुखी पडलेल्या माध्यमकर्मीचे कुटुंबीयांना सर्वोतोपरी सहकार्य करण्याची विनंती करणारे निवेदन देण्यात आले.असंघटित कर्मचारी म्हणून श्रमिक पत्रकार व पत्रकारेत्तर याचे रजिस्ट्रेशन करून पत्रकार अशी रितसर ओळख देण्याची,माध्यमकर्मीसाठी महामंडळ गठीत करण्याची विनंती करण्यात आली आहे,जेणेकरून या माध्यमातून खऱ्या पत्रकारांना न्याय मिळेल आणि कोणतीही मदत,सहकार्य, सुविधा थेट मिळण्यास सहकार्य होईल. आपल्या या मागण्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी तातडीने संवेदनशीलतेने निर्णय घेतील, आणि या विषयात विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलमताई गोर्हे यांचेही अमूल्य सहकार्य मिळेल असा विश्वास एनयुजेमहाराष्ट्र अध्यक्ष व एनयुजे इंडिया च्या सचिव शीतल करदेकर यांनी व्यक्त केला.

संबंधित बातम्या
‘मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया’च्या पुणे विभागीय संघटन सहसचिवपदी लक्ष्मणराव खटके
प्रगल्भनायक दि.22/08/2023 रोजीचा अंक
प्रगल्भनायक दि.21/08/2023 रोजीचा अंक