अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:
उद्या रात्री 8 वाजल्यापासून नवे निर्बंध होणार लागू!
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता जनतेला संबोधित करत पुढील 15 दिवस कडक निर्बंध जाहीर केले आहेत. उद्या रात्री 8 वाजल्यापासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
लॉकडाऊन सदृश्य निर्बंध
● येणे जाणे पूर्ण बंद
● आवश्यक काम नसेल तर घराबाहेर पडायचे नाही
● अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापने बंद
● सार्वजनिक वाहतुक म्हणजे लोकल, बस व्यवस्था सुरू राहणार; त्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्यांसाठी वापरले जाणार
● वैद्यकीय सेवा, लस उत्पादक, वैद्यकीय वाहतुक, वैद्यकीय साहित्य वाहतूक सुरू राहणार
● शीतगृह, जनावरांचे दवाखाने, शेतीची कामे सुरू राहतील
● बँका, आर्थिक संस्था, अधिस्वीकृती धारक पत्रकार सुरू राहणार
● बांधकाम साईट सुरू राहणार, तिथे काम करणारे कर्मचार्यांची तिथेच राहण्याची व्यवस्था करण्याची अट
हॉटेल्स, रेस्टॉरंट बंद, मात्र होम डिलिव्हरी सुरू राहणार
● रस्त्यावरील खाद्यपदार्थ सेवा सुरू राहणार
रोजी बंद झाली तरी रोटी मिळणार- मुख्यमंत्री
● लाभार्थीना ३ किलो गहु आणि दोन किलो तांदुळ एक महिना मोफत
● सात कोटी लोकांना मोफत धान्य
उद्या संध्यकाळी 8 पासून काय सुरु काय बंद…
📌उद्या संध्यकाळी 8 पासून
राज्यात निर्बंध….
📌उद्या संध्यकाळपासून ब्रेक द चेन या मोहिमेतर्गत 144 कलम लागू..
📌उद्यापासून राज्यात संचारबंदी
📌अत्यावश्यक काम नसेल तर कोणीही बाहेर पडू नये…
📌सर्व आस्थापना बंद राहतील (अत्यावश्यक सेवा वागळता)
📌सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद राहणार नाही… त्याचा वापर केवळ अत्यावश्यक सेवेसाठीच
📌रुग्णालये, मेडीकल, लस उत्पादक, वाहने, मास्क इत्यादि सुरु..
📌हवाई वाहतूक, रेल्वे, सुरु
📌पावसाळी कामे सुरु राहतील
📌बँक, इ- कॉमर्स सुरु
📌पेट्रोल पंप सुरु राहतील
📌हॉटेल्स, बार बंद,
फक्त पार्सल सुरु
📌सकाळी 7-8 रस्त्यावरील खाद्य पदार्थ विक्री पार्सल सुरु…
📌राज्यसरकराकडून अन्न सुरक्षा योजनेतर्गत लाभार्त्यांना पुढील एक महिना 3 किलो गहू आणि 2 किलो तांदूळ (प्रत्येकी)
📌पुढील एक महिन्यासाठी शिवभोजन थाळी मोफत
📌कामगार कल्याणकारी मंडळ अंतर्गत 1500 रुपये प्रत्येक
📌अधिकृत फेरीवाले यांना प्रत्येकी 1500 रुपये..
📌परवानधारक रिकशाचालक प्रत्येकी 1500 रुपये
📌आदिवासी कुटुंबाना एक वेळचे 2000 रुपये
📌 3 हजार 300 कोटी फक्त कोविड साठी
एकूण 5 हजार 400 कोटी रुपये निधी

संबंधित बातम्या
‘मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया’च्या पुणे विभागीय संघटन सहसचिवपदी लक्ष्मणराव खटके
प्रगल्भनायक दि.22/08/2023 रोजीचा अंक
प्रगल्भनायक दि.21/08/2023 रोजीचा अंक