
सजग भावीपिढीसाठी एनयुजेमहाराष्ट्र व घोडावतची टिम मिळून काम करेल:विनायक भोसले
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/हातकणंगले/सांगली:
‘लेने के लिए ज्ञान,देने के लिए दान,व्यवहार के पहिले संस्कार और छोडने के लिए अभिमान’ या चार गोष्टी आपल्या आयुष्यात लक्षात ठेवल्यास आपण निश्चितच सक्सेस होतो! जीवनात शॉर्टकट मारणारा सक्सेस होत नाही.अल्वेज बी पॉझिटिव, हार्ड वर्क करा, हार्ड वर्क बरोबरच स्मार्ट वर्क गरजेचे आहे !
नवीन युवा पिढी घडविण्यासाठी एन यु जे महाराष्ट्र ची कोल्हापूर विभाग टीम आणि आमची टीम मिळून आपण चांगले काम करेल. नव्यानेच आम्ही मास कम्युनिकेशनचा अभ्यासक्रम सुरू केलेला आहे. त्यासाठी एन यु जे महाराष्ट्र च्या अध्यक्ष शीतलताई करदेकर आणि कोल्हापूर विभागातील ज्येष्ठ पत्रकार यांच्या अनुभवाचा फायदा नव्या पिढीला निश्चितच होईल.
‘एन यु जे महाराष्ट्र सन्मान सोहळा 2021’ च्या निमित्ताने घोडावत युनिव्हर्सिटीच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात सुशीला दानचंद घोडावत ट्रस्टचे ट्रस्टी विनायक भोसले बोलत होते.
ते पुढे म्हणाले,कोल्हापूरचे अध्यक्ष डॉ.सुभाष सामंत यांनी अतिशय कमी वेळेत या दिमाखदार सोहळ्याचे यशस्वी आयोजन केले.त्याबद्दल त्यांना आणि त्यांच्या टीमला आमच्या शुभेच्छा! भविष्यात अशाच प्रकारचा भव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोजन केले तर त्या कार्यक्रमांची संपूर्ण जबाबदारी आम्ही उचलू!
यावेळी नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्स महाराष्ट्रच्या ( एन यु जे एम) अध्यक्ष व एनयुजे इंडियाच्या सचिव शीतलताई करदेकर कोल्हापूर विभागाच्या टीमला मार्गदर्शन करताना म्हणाल्या,” समाजातील घटकांना न्याय देण्यासाठी झटणारा पत्रकार 24 तास सेवा देत असतो.कोरोना काळातही पत्रकार आपल्या जीवाची पर्वा न करता सामाजिक बांधिलकीतून कार्यरत राहतो आहे. खरे तर हे काम शासनाचे! पण शासन व समाज यातला दुवा म्हणून पत्रकार आघाडीवर राहून काम करतो.
त्या पत्रकाराला केद्र शासनाने एका काळ्या कायद्यान्वये त्याच्या रोजीरोटीचा हक्क हिरावून घेतला आहे.
वीटभट्टी कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन देण्यासाठी राज्यसरकार प्रयत्न करते,मग आम्हा श्रमिक पत्रकारांचा विचार सरकार का करत नाही? खरेतर मालक आणि पत्रकार मिळून मिडीया तयार होत असतो.केंद्र सरकारने वेज बोर्ड रद्द करून श्रमिक पत्रकारांना अस्थिर केले आहे. सरकारच्या अशा अन्यायी धोरणाविरुद्ध युनियन सातत्याने लढा देत आहे,आझाद मैदानावर सरकारच्या या काळ्या कायद्याविरोधात आंदोलन करणारी देशातील ही एकमेव युनियन आहे. राज्य सरकारकडे आमची आग्रही मागणी आहे की,सर्वांना जातीवाचक महामंडळ देता, आम्हा पत्रकारांसाठीही महामंडळ द्यावे. पत्रकारितेतील कचरा व घुसखोरी थांबविण्यासाठी पत्ररकार रजिस्ट्रेशन मश्ट आहे!”
सिंधुदुर्ग,सांगली,बेळगाव या तीन जिल्ह्याच्या सहयोगाने यजमान कोल्हापूर विभागाने ‘सन्मान सोहळा 2021’ अल्प कालावधीत यशस्वी करीत असताना उत्तम टीम वर्क आणि जिल्हाध्यक्ष सुभाष सामंत यांचे नेतृत्व गुण दृष्टिपथास आले. या विभागाने आपले बेळगावमधील मराठी पत्रकारांना सहकार्य करावे, मराठी भाषिकांवरील अन्यायाविरुद्ध आपण लढले पाहिजे! ती भूमी आपली आहे. सरकारने व संबंधितांनी बेळगाव प्रश्न भिजत ठेवू नये!”
यावेळी महा हिट 24 च्या एमडी आणि स्वर्गीय राज सरकार यांच्या पत्नी ऍड. नुसरत मुजावर यांनी पती राज सरकार आणि जिल्ह्यातील पत्रकार यांचे चांगले संबंध होते,त्यांचा वारसा चालविण्याचे अभिवचन दिले.
तसेच घोडावत कॉलेजचे प्राचार्य विराट गिरी आणि कोल्हापूर विभागाचे माहिती व जनसंपर्क अधिकारी सातपुते यांनीही मार्गदर्शन केले.
एनयुजेमहाराष्ट्र सन्मान या देखण्या सोहळ्यात पत्रकारितेसह विविध क्षेत्रातील सामाजिक बांधिलकीतून योगदान देणाऱ्यांचा सन्मानीत करण्यात आले.
रत्नागिरी टाईम्सचे संपादक उल्हासराव घोसाळकर याचा सन्मान सिंधुदुर्गचे अध्यक्ष लक्ष्मण आढाव यांनी स्वीकारला.बेळगावचे ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मणराव हवालदार ,टिव्ही9 चे पत्रकार विश्वनाथ येल्लुळकर ,जय महाराष्ट्रचे ज्ञानेश्वर साळोखे ,मराठीयनचे सूत्रसंचालक नदाफ तांबोळी ,सकाळचे पत्रकार मिलिंद देसाई ,जागृत जनमतचे संपादक विनोद पाटील यांचा गौरव करण्यात आला.मानपत्र, सन्मानचिन्ह ,शाल,श्रीफळ असे या सन्मानाचे स्वरूप होते.
उज्ज्वलाताई संभाजी पाटील,अध्यक्ष,साहेब फाऊंडेशन, बेळगाव यांचा सामाजिक कार्य व बेळगावसह महाराष्ट्र लढाईतील महत्त्वपूर्ण योगदानासाठीचा सन्मान एनयुजे महाराष्ट्र बेळगाव सचिव जितेंद्र पाटील व बेळगावचे प्रतिनिधींनी स्वीकारला.
एम.एच.मोतीवाले(सामाजिक कार्य,बेळगाव),राजू मगदूम (सरपंच, ग्रामपंचायत माणगांव ),डॉ.उत्तम मोहन मदने (सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी),प्रशांत सातपुते (जिल्हा माहिती अधिकारी कोल्हापूर),डॉ.जेसीका अँड्र्यूस (वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र पुलाची शिरोली ),तेजस्वीनी पाटील (मुख्याध्यापिका भाऊसो चौगुले बालविद्यामंदिर आळते),जयसिंगपूर येथील प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ.रियाज अत्तार,मलेकाखानम महम्मदशफी पटेल -(सामाजिक,शैक्षणिक ),सुनील मांडरे (आरोग्य सेवक), सुभाष उत्तम सातपुते (पर्यावरण रक्षण व युवक संघटन) राजेवाडी जि.सांगली), उमेशजी पाटील( सामाजिक संघटन,करगणी जि.सांगली),अनिलशेठ सर्जेराव पाटील (युवा संघटन व सामाजिक विकास,आटपाडी जि.सांगली),श्री.हणमंतराव धोंडीसाहेब देशमुख (राजकिय व सामाजिक कार्य,दिघंची जि.सांगली)
ह.भ.प.तुकाराम बाबा महाराज (श्रीसंत बागडेबाबा मानवमित्र संघटन, धार्मिक व सामाजिक कार्य) (जत,जि.सांगली),डाॅ. उमाकांत कदम(प्रशासन, वैद्यकीय सेवा),संतोषभाऊ पुजारी (युवा संघटन) आदि मान्यवरांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य अरूणराव इंगवले,एनयुजेमहाराष्ट्र रायगड अध्यक्ष व एनयुजे इंडिया कार्यकारिणी सदस्य सुवर्णा दिवेकर, पालघर अध्यक्ष विजय देसाई, नवी मुंबई उपाध्यक्ष सुनिल कटेकर,सांगली जिल्हा अध्यक्ष लक्ष्मणराव खटके, विनयकुमार पाटील, शेखर घोंगडे, भुपेश कुंभार, जितेंद्र पाटील, पोपट वाकसे, सुनील सुर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सन्मान सोहळ्यास सहकार्य करणाऱ्या मान्यवरांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.



संबंधित बातम्या
‘मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया’च्या पुणे विभागीय संघटन सहसचिवपदी लक्ष्मणराव खटके
प्रगल्भनायक दि.22/08/2023 रोजीचा अंक
प्रगल्भनायक दि.21/08/2023 रोजीचा अंक