रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हा एनयूजेएमच्या गुगल मीट बैठकीत माध्यामकर्मिंचा मोठा सहभाग
पत्रकारांचे नेते म्हणवून घेत दिशाभूल करणाऱ्या नेत्यांनी केवळ स्वतःचा स्वार्थ साधला
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /रत्नागिरी :
पत्रकारांचे नेते म्हणवून घेत दिशाभूल करणाऱ्या नेत्यांनी केवळ स्वतःचा स्वार्थ साधला. माध्यामकर्मिंचे हक्क, अधिकार याची माहिती पत्रकारांना न देता अशा स्वार्थी नेत्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी पत्रकारांना आपल्या मागून फिरविण्याचे आणि त्यांना वेठीस धरण्याचे काम केले. मात्र यापुढे हे चालणार नाही. कारण एन यू जे एम माध्यामकर्मिंच्या हितासाठीच मैदानात उतरली आहे, असे रोख ठोक प्रतिपादन नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट अर्थात एनयुजे महाराष्ट्रच्या अध्यक्ष शीतल करदेकर यांनी केले. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हा एन. यू.जे.एम. च्या गूगल मीट बैठकीत त्या बोलत होत्या.
यावेळी राज्य अध्यक्ष शीतल करदेकर यांनी बैठकीत सहभागी पत्रकारांच्या अडचणी व समस्यांबाबत मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या की,आझाद मैदानात काळ्या कायद्याविरोधात जी लढाई सुरु केलीय ती आता थांबणार नाही. मूळात आपले हक्क अधिकार यांची माहितीच पत्रकारांना नसणे आणि तिचा उपयोग कसा, कधी करायचा हे माहिती न करुन देण्यात आणि दिशाभूल करण्याचे ,आपले स्वार्थासाठी आपले मागून फिरवण्याचं काम स्वतंःला पत्रकारांचे नेते म्हणवणा-यांनी केले. हे आता चालणार नाही. त्यामुळे संघटनेत संख्या किती जास्त यापेक्षा सच्चे कार्यकर्ते जोडणे महत्वाचे आहे. ख-या पत्रकारांना त्यांचे हक्क मिळण्यासाठी आम्ही पत्रकार रजिस्ट्रेशन मागतोय, असेही करदेकर म्हणाल्या.
नँशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस् इंडिया,नवी दिल्लीशी संलग्न असलेली नँशनल युनियन आँफ जर्नालिस्टस महाराष्ट्र सर्व माध्यमकर्मींच्या हितासाठी सनदशीर मार्गाने लढत आहे. देशातील सर्वात जुनी व लढाऊ युनियन म्हणून एनयुजे इंडियाची ओळख आहे. जी इंटरनँशनल फेडरेशन आँफ जर्नालिस्टस ,ब्रुसेल्सची सदस्य आहे. ही युनियन रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारांच्या हितासाठी आता गतीमानपणे काम करेल, असा विश्वास एनयुजे महाराष्ट्रचे संघटन सचिव कैलास उदमले यांनी प्रास्ताविकात व्यक्त केला.
रत्नागिरीचे ज्येष्ठ पत्रकार प्रकाश वराडकर यांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाची आणि एनयुजेएम कडून मिळालेल्या सहकार्याची माहिती दिली. आपल्या अडचणीत सर्व मार्गानी मदत करणारी ही आपली युनियन आहे. जी आपले कोकणपुत्र, सर्व माध्यमांतील पत्रकारांना मोठा आधार ठरत असून अनेक गुणवंत पत्रकार काम पाहून युनियनबरोबर जोडले जात आहेत, असा ठाम विश्वास वराडकर यांनी व्यक्त केला. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातही एन.यू.जे.महाराष्ट्र अधिक मजबूत होत असून अनेकजण येत्या काही दिवसात युनियनबरोबर जोडले जातील,असे सिंधुदुर्गचे पत्रकार लक्ष्मण आढाव यांनी सांगितले.
राज्य अध्यक्ष शीतल करदेकर यांच्या भाषणाने एक प्रेरणा मिळाली असे चैतन्यपूर्ण मार्गदर्शन आजवर कधीही ऐकले नव्हते.आम्हाला विश्वास आहे, की कोकणातील माध्यमकर्मी आगामी काळात मोठ्या प्रमाणात एनयुजे महाराष्ट्र परिवाराचा भाग बनतील, असे पत्रकार रमझान गोलंदाज यानी आभार मानताना सांगितले. या बैठकीत दोन्ही जिल्ह्यातील माध्यमकर्मी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
माध्यामकर्मीची व्याप्ती मोठी
माध्यामकर्मि या शब्दाची व्याख्या मोठी आहे. सध्या प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, डिजिटल न्यूज पोर्टल, यू ट्यूब चॅनल्स यासारखी विविध प्रसारमाध्यमे कार्यरत आहेत. त्यामुळे या माध्यमांसाठी काम करणारे पत्रकार आणि माध्यमांसाठी काम करणारे छायाचित्रकार, डीटीपी ऑपरेटर, माध्यमांसाठी काम करणारे कर्मचारी हे सर्व माध्यमकर्मि असून त्यांना एन.यू.जे.एम.मध्ये सहभागी करून घेता येणार असल्याचे मार्गदर्शन यावेळी मान्यवरांनी केले.


संबंधित बातम्या
‘मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया’च्या पुणे विभागीय संघटन सहसचिवपदी लक्ष्मणराव खटके
प्रगल्भनायक दि.22/08/2023 रोजीचा अंक
प्रगल्भनायक दि.21/08/2023 रोजीचा अंक