जत ‘राष्ट्रवादी’चा कृषी कायद्याविरोधी आंदोलनास पाठिंबा

अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:

जत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात नवे तिन्ही कायदे रद्द करण्याची मागणी करत देशाच्या राजधानी दिल्ली येथे शेतकऱ्यांनी मागील 12 दिवसांपासून एल्गार पुकारला असून संपूर्ण देशभर बंद पाळण्यात येत आहे, अशा या आंदोलनास जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जत तालुक्याच्या वतीने जाहीर पाठिंबा देत असल्याचे पत्र जत तहसीलदार सचिन पाटील यांना सादर करण्यात आले.
राष्ट्रवादी युवक जिल्हा उपाध्यक्ष अशोक कोळी, जत तालुकाध्यक्ष रमेश पाटील, जत तालुका कार्याध्यक्ष अध्यक्ष उत्तम चव्हाण, जत तालुका उपाध्यक्ष आप्पाराया रेऊर व मच्छिंद्र वाघमोडे, जत तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी कॉग्रेस पार्टी सतीश उर्फ पवन कोळी, आ.रोहितदादा पवार फॅन्स क्लब, महाराष्ट्र राज्यचे प्रदेशाध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस वक्ता प्रशिक्षण विभाग सांगली जिल्हा उपाध्यक्ष जयंत भोसले, राष्ट्रवादी काँग्रेस वक्ता प्रशिक्षण विभाग सांगली जिल्हा सदस्य रुपेश पिसाळ, आ.रोहितदादा पवार फॅन्स क्लब सांगली जिल्हा उपाध्यक्ष हेमंत खाडे, रमजान (बंटी) नदाफ, हेमंत चौगुले, सागर चंदनशिवे, मयूर माने, अमरसिंह माने-पाटील, प्रविण साळे, अक्षय माडे, पंकज संकपाळ, शफीक इनामदार, राजू मुल्ला व अन्य पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.