
एनयुजेएम कोल्हापूर जिल्हासचिव शेखर धोंगडे यांचा सत्कार!
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क, सांगली/कोल्हापूर:
नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस् महाराष्ट्र कोल्हापूर जिल्हा हातकणंगले तालुका कार्यकारिणी निवड प्रक्रिया राज्याध्यक्षा शीतलताई करदेकर यांच्या निर्देशानुसार कोल्हापूर जिल्हाध्यक्ष डॉ.सुभाष सामंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडली.
जिल्हा बैठकीत संघटन सचिव कैलास उदमले व विशाल सावंत यांचे मार्गदर्शनाखाली कोल्हापूर जिल्हातील महत्वपूर्ण पदांची निवड तसेच हातकणंगले तालुका कार्यकारिणीची निवड निवडणूक प्रक्रियेद्वारे करण्यात आली.
तालुका निवडणूकीसाठी निवडणूक निरीक्षक म्हणून ज्येष्ठ पत्रकार शेखर धोंगडे यांनी काम पाहिले.
जिल्हा उपाध्यक्ष पदी विनयकुमार पाटील (महान कार्य) व सचिवपदी शेखर धोंगडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
हातकणंगले तालुकाध्यक्ष पदी सतीश पाटील(महानकार्य),कार्याध्यक्ष बाबुराव जाधव (तरुण भारत),उपाध्यक्ष कुबेर हंकारे(महान कार्य),उपाध्यक्ष राहुल वराळे,सम्राट,किर्तीवंत,उपाध्यक्ष राजेंद्र शिंदे(एस.पी.एन.डिजिटल),उपाध्यक्ष रमेश बोभाटे(महान कार्य),सचिव तौफिक मुजावर (पुढारी),खजिनदार निवास चौगले(अन्वेषण)समन्वयक रोहन साजणे(किर्तीवंत),सदस्य अल्लाउद्दीन मुल्ला अन्वेषण) आदींची निवड निवडणूक निर्णय अधिकारी व जिल्हा सचिव धोंगडे यांनी जाहीर केली.नूतन पदाधिकाऱ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.तालुका कमिटीच्या वतीने नूतन जिल्हासचिव शेखर धोंगडे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष पोपटराव वाकसे,राजेश वाघमारे,संतोष कांबळे,अब्दुल नदाफ,रत्नदीप घोलप,प्रणव कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.

संबंधित बातम्या
‘मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया’च्या पुणे विभागीय संघटन सहसचिवपदी लक्ष्मणराव खटके
प्रगल्भनायक दि.22/08/2023 रोजीचा अंक
प्रगल्भनायक दि.21/08/2023 रोजीचा अंक