
अनिल मदने
जत/प्रतिनिधी:
जत शहरासह तालुक्यातील कोरोनाची साखळी रोखण्यासाठी जत नगरपरिषद व तालुका प्रशासन यांनी व्यवसाईकांना ‘नो मास्क,नो फुड व गुड’ ही संकल्पना राबविण्यासंदर्भात जनजागृती करावी अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत उर्फ पापा कुंभार यानी केली आहे.
कुंभार यानी म्हटले आहे की, जत शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रूग्ण आढळून येत असल्याने एक दिवस तालुक्यात कोरोनाचा विस्फोट झाल्याशिवाय राहणार नाही. जत शहरासह तालुक्यातील कोरोनाची साखळी रोखण्यासाठी जत नगरपरिषद,जत पोलीस व तालुका प्रशासन यांनी कडक अंमलबजावणी करण्याची वेळ आली आहे.
सद्धस्थितीत जत शहरासह तालुक्यात बहुतांशी नागरिक हे तोंडाला मास्क न लावता फिरताना दिसत आहेत. कोरोनाचे विषाणू हे तोंडावाटे शरिरात प्रवेश करित असल्याने जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनावर सद्यातरी मात करेल अशी कोणतीही लस उपलब्ध नसल्याने कोरोनापासुन आपला बचाव करण्यासाठी तोंडाला मास्क लावणे,सोशल डिस्टन्सिंग व सॅनिटराइजचा वापर या उपाययोजना सांगीतल्या आहेत. परंतु या उपाययोजनेकडे लोकांचे दुर्लक्ष होत असल्याने कोरोनाचे रूग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत.
कोरोनाची ही साखळी रोखण्यासाठी जत शहरासह तालुक्यातील सर्वच व्यवसाईकानी जो ग्राहक दुकानातील माल खरेदी करण्यासाठी येइल त्या ग्राहकाला तोंडाला मास्क असल्याशिवाय माल देऊ नये .यामुळे जनजागृती होऊन लोकांना मास्क लावण्याची सवय होइल व यामुळे कोरोनाची साखळी रोखण्यासाठी मदतच होईल.
जत शहरासह तालुक्यातील आतापर्यंतच्या कोरोनाबाधित रूग्णांची संख्या ही १०७८ झाली आहे. तर कोरोनातून बरे होणारे रूग्णांची संख्या ही ७२१ आहे.सध्या उपचाराखाली ३१९ रूग्ण असून होम अयसोलेशन मध्ये २५५ रूग्ण आहेत. आतापर्यंत ३८ रूग्ण कोरोनाला बळी पडले आहेत.
कोरोनाची ही साखळी रोखण्यासाठी जतचे उपविभागीय अधिकारी श्री. प्रशांत आवटे, जतचे तहसिलदार श्री. सचिन पाटील, गटविकास अधिकारी श्री. अरविंद धरणगुत्तीकर , पोलीस उपअधीक्षक श्री. संदिपसिंह गिल व पोलिस निरीक्षक श्री. उत्तमराव जाधव तसेच जत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. मनोज देसाई यांच्या व जतचे आमदार श्री. विक्रमसिंह सावंत यांच्या अध्यक्षतेखाली जत शहरासह तालुक्यातील प्रमुख सर्व पक्षिय राजकिय नेतेमंडळी व सामाजिक कार्यकर्ते यांची बैठक घेऊन या बैठकीत जत शहरासह तालुक्यातील व्यापारी प्रतिनिधी यांना आमंत्रित करून ‘नो मास्क नो फुड व गुड’ ही संकल्पना राबविण्यासंदर्भात जनजागृती करावी अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत उर्फ पापा कुंभार यानी केली आहे.


संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती