
आटपाडी तालुका भटकेविमुक्त संयोजन समितीचे संघटक विश्वनाथ सरगर यांची मागणी !
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी
आटपाडी तालुक्यात २७, २८ व २९ सप्टेंबरला “भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियान” राबवा अशी मागणी अग्रणी सोशल फौंडेशन व आटपाडी तालुका भटकेविमुक्त संयोजन समितीचे संघटक विश्वनाथ सरगर तळेवाडी यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
महाराष्ट्र शासन महसूल विभागाच्या वतीने “राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता” अभियानांतर्गत राज्यभर “भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियान” राबविण्यात येणार आहे.
त्या अनुषंगाने अग्रणी सोशल फौंडेशनचे संघटक विश्वनाथ सरगर यांचे वतीने आटपाडी तालुका तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.निवेदनात म्हटले आहे की, आटपाडी तालुक्यात मोठ्या प्रमाणात भटके-विमुक्त समाजाचे नागरिक वास्तव्यास आहेत.
अनेकांकडे जात प्रमाणपत्र, अधिवास, रहिवास, उत्पन्न प्रमाणपत्र यांसारखी आवश्यक शासकीय कागदपत्रे नसल्यामुळे त्यांना शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ घेता येत नाही.तरी या शासन अभियानाचा लाभ प्रत्यक्ष गरजूंना मिळावा यासाठी दि. २७, २८ व २९ सप्टेंबर २०२६ रोजी आटपाडी तालुक्यातील प्रत्येक वस्ती पातळीवर विशेष शिबिर आयोजित करण्यात यावे.अशी मागणी करण्यात आली आहे.या निवेदनाची प्रत मा. तहसीलदार,उपविभागीय अधिकारी आणि मा. जिल्हाधिकारी, सांगली यांना माहितीसाठी पाठविण्यात आली आहे.

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती