राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा सरचिटणीस पदी नरेंद्र दिक्षीत यांची वर्णी

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) च्या सांगली जिल्हा सरचिटणीसपदी आटपाडी येथील तरुण कार्यकर्ते नरेंद्र गजानन दिक्षीत यांची निवड करण्यात आली आहे. सांगली जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिलशेठ पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे नरेंद्र दिक्षीत हे पक्षातील सक्रीय आणि निष्ठावान कार्यकर्ते आहेत.

त्यांच्या कामाची दखल घेत जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांच्या हस्ते त्यांना अधिकृत निवडीचे पत्र देण्यात आले. या निवडीच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. ग्रामीण भागातील तरुणकार्यकर्त्यांना संघटनात्मक जबाबदाऱ्या देत पक्ष नव्या उत्साहात पुढे जात असल्याचे निरीक्षक सांगत आहेत. नरेंद्र दिक्षीत हे गेल्या काही वर्षांपासून

आटपाडी तालुक्यात सामाजिक, राजकीय क्षेत्रात सक्रीय असून विविध जनहिताच्या उपक्रमांमधून त्यांनी विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्षपदी उल्लेखनीय कामगिरी करून सांगली जिल्ह्यामध्ये आपली ओळख निर्माण केली आहे.पक्षाच्या विचारधारेवर विश्वास ठेवत संघटनेच्या बळकटीसाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत.

या निवडीबद्दल नरेंद्र दिक्षीत यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, पक्ष नेतृत्वाने माझ्यावर दाखविलेला विश्वास मी निष्ठेने आणि प्रामाणिकपणे पाळणार आहे. जिल्हा अध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील आणि आमचे प्रेरणास्थान अनिलशेठ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष संघटन आणखी मजबूत करण्याचा माझा प्रयत्न राहील. दरम्यान, या निवडीबद्दल आटपाडी तसेच जिल्ह्यातील कार्यकर्त्यांकडून नरेंद्र दिक्षीत यांचे अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला नवसंजीवनी मिळेल, अशी प्रतिक्रिया स्थानिक स्तरावर व्यक्त होत आहे.

नरेंद्र दिक्षीत यांना निवडीचे पत्र देताना, माजी मंत्री शिवाजीराव नाईक यावेळी माजी आम. राजेंद्रअण्णा देशमुख, निशिकांत भोसले पाटील, अनिलशेठ पाटील,विनायकराव मासाळ व मान्यवर उपस्थित होते.