तरुणाचा गळफास घेऊन मृत्यू

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
म्हसवड

: दिनांक 4 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी सुमारे 6 वाजण्याच्या सुमारास वरकुटे म्हसवड (ता. माण, जि. सातारा) येथे एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. गावातील 27 वर्षीय तरुण गणेश विलास माने याने आपल्या राहत्या नवीन खोलीतील लोखंडी अँगलला दोरीने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविल्याची माहिती पुढे आली आहे.

या प्रकरणी मयताचा चुलत भाऊ सचिन महादेव माने (वय 29 वर्ष, राहणार वरकुटे म्हसवड) यांनी म्हसवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, अकस्मात मृत्यू रजिस्टर (अ.म.क्र.) क्रमांक 28/2025 प्रमाणे नोंद घेण्यात आली आहे. सदर घटना दिनांक 04/08/2025 रोजी रात्री 9:32 वाजता पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली.

गणेश माने याने आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पुढील तपास सपोनि अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली म.पो.हवा फडतरे हे करत आहेत. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
गावात या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत्यूचे नेमके कारण तपासाअंती स्पष्ट होणार आहे.