
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
टेंभुर्णी
कारला वाचवताना कंटेनरने (ट्रेलर) साईडने जाणाऱ्या दोन दुचाकीस चिरडले. या तिहेरी भीषण अपघातात दुचाकीवरील दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून हा अपघात सोलापूर-पुणे महामार्गावर वेणेगांव (ता. माढा) येथील ब्रीज जवळ शनिवार, दि.२६ जुलै रोजी दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान झाला.
याबाबत अधिक माहिती अशी की, ट्रेलर (क्र. के.ए-३४-डी २९७६) हा पुण्याकडून सोलापूरकडे निघाला होता. तो वेणेगांव ब्रिजजवळ आला असता ब्रीज खालून उजव्या बाजूने पंढरपूरकडून अचानक कार आली. या सोलापूरकडे जाणाऱ्या भरधाव कारला (क्र- एम.एच-३० ए.एफ- ९६२१) वाचवण्यासाठी ट्रेलर चालकाने त्याचा ट्रेलर रस्त्याच्या बाजूला घेत असताना ट्रेलरने (क्र. एमएच १२-इके ९७७६) या
दुचाकीवरील तानाजी तुकाराम खंडाळे (वय ७०, रा. सापटने (टें), ता. माढा) यांना व दुचाकी (क्र.एमएच ४५-एजे-०४७६) वरील सुखराम राधाकृष्ण जांगीड (वय-५०, रा. सारंडा, ता. मेडतासिटी, जि. नागूर, राजस्थान) या दोन दुचाकी स्वारांना पाठीमागून जोरदार
धडक देऊन चिरडले. हा अपघात एवढा भीषण होता की या अपघातात एका दुचाकी चालकाच्या अंगावरुन ट्रेलरची चाके गेल्यामुळे तसेच ट्रेलरने त्यांना तसेच काही अंतर फरफटत रस्त्याच्या बाजूला नेल्यामुळे दोन्ही दुचाकीस्वारांचा जागीच चिरडून मृत्यू झाला. जांगीड हे फर्निचर करण्याचे काम करीत होते.
अपघाताची माहिती मिळताच वरवडे येथील टोल नाका येथील रुग्णवाहिकेतून व टेंभुर्णी येथील अकबर खान यांच्या रुग्णवाहिकेमधून टेंभुर्णी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघाताची माहिती मिळताच टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार, अपघात पथकाचे पोहेकॉ गणेश जगताप, पो.कॉ. सरडे टीमसह हजर झाले. त्यांनी वाहतूक सुरळीत केली. यावेळी वरवडे टोल प्लाजा येथील गस्तीपथक, मोडनिंब महामार्ग पोलीस मदत केंद्राचे अधिकारी पोसई बालाजी साळुंखे व त्यांचे पोलीस कर्मचारी उपस्थित

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती