सुळेवाडी येथील ग्रामसेवकाच्या मनमानी कारभाराविरुदध गंगुबाई सुळे यांची पालकमंत्री, मुख्य कार्यकारी अधिकारी व गटविकास अधिकारी यांच्या कडे तक्रार

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क

पिलीव

माळशिरस तालुक्यातील सुळेवाडी गावात ग्रामसेवक यांच्या मनमानी कारभाराविरुदध येथील महीला गंगुबाई बाबुराव सुळे यांनी लेखी निवेदनादवारे सोलापूर जिल्हयाचे पालकमंत्री जयकुमार गोरे, सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, माळशिरस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तसेच सुळेवाडीचे सरपंच यांच्या कडे लेखी निवेदनादवारे तक्रार केली आहे.

या निवेदनामध्ये त्यांनी सुळेवाडी येथील माझ्या मालकीच्या गट नंबर दोन मध्ये त्यांनी माझी कोणतीही परवानगी न घेता सिमेंटचा रस्ता केला आहे. हे क्षेत्र माझ्या मालकीचे असुन देखील त्यांनी मला याबाबत विचारले सुद्धा नाही. यामध्ये त्यांनी शासनाच्या लाखो रुपयाचा अपहार केला आहे. गटारीचे बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे केले आहे.

गावाच्या पुर्वेला गावठाण हद्दी लगत आमचे शेत आहे सदरच्या शेतातुन ग्रामपंचायत मालकीच्या रस्त्यावर अनेक लोकांनी अतिक्रमण केले आहे. याबाबत तक्रार केल्यानंतर तत्कालीन गटविकास अधिकारी यांनी लेखी आदेश देऊनही सदर च्या ग्रामसेवकाने जाणुन बुजुन अतिक्रमण काढले नाही.

तुम्ही माझी आमदार साहेबांकडे तक्रार करता काय माझा भाऊ सुद्धा आमदार साहेबांच्या गावचाच आहे. तुम्ही करुन करुन माझे काय करचाल अशी अरेरावीची भाषा आम्हाला बोलत आहेत.अश्या भ्रष्ट, अकार्यक्षम ,बेजबाबदार ग्रामसेवकाची ताबडतोब बदली करावी .तसेच माझ्या गट नंबर दोनमधील रस्ता ताबडतोब खुला करुन दयावा अन्यथा मी स्वतः हुन हा रस्ता बंद करणार असल्याचा इशारा त्यांनी लेखी निवेदनादवारे दिला आहे.

याबाबत सुळेवाडीचे ग्रामसेवक यांच्या कडुन जाणुन घेण्याचा प्रयत्न केला यासाठी त्यांना मोबाईल वरुन दोन – तिन वेळा संपर्क साधला असता त्यांनी मोबाईल उचललाच नाही.