प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
दिघंची
दिघंची परिसरात एकच खळबळ ( माण – खटाव) प्रतिनिधी पळसखेल ता. आटपाडी येथे पळसखेल अवळाई रोडवर राम मंदिर च्या पाठीमागे कॅनॉलच्या मोठ्या नळीमध्ये पाच दिवसांची जिवंत मुलगी एका फडक्यामध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत आढळली. व ती मुलगी मोठमोठ्या आवाजाने ओरडू लागली तिचा आवाज
पर गावाहून परत निघालेले मेंढपाळ शेतकरी यांच्या कानावर पडला त्यांनी आवाजाच्या दिशेने जात पळसखेल गावातील नागरिकांना सांगितले. त्या ठिकाणी पळसखेल गावचे पोलिस पाटील प्रकाश सावत अजिनाथ सावत रोहित सावत तंटामुक्ती अध्यक्ष बापूराव पाटील वैभव काळे व गावातील नागरिक यांनी ते मूल घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्र दिघची येथे दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ सावंत यांनी प्राथमिक उपचार करून पुढे ग्रामीण रुग्णालय आटपाडी येथे पाठविण्यात आले. यांची माहिती व तक्रार आटपाडी पोलिस ठाणे येथे करण्यात आली व पुढील तपास पोलिस अधिकारी करत आहेत .


संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती