मेंढपाळ समाजाचा अभिमान – आयपीएस बिरदेव डोणे यांना मनःपूर्वक शुभेच्छा…!

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क

आटपाडी

“यूपीएससीच्या रँकमध्ये झळकला, तेव्हा बिरू मेंढरे चारत होता!”

यमगे ता. कागल जि.कोल्हापुर येथील साध्या मेंढपाळ कुटुंबातील बिरदेव डोणे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून UPSC परीक्षा उत्तीर्ण करून IPS अधिकारी होण्याचा मान मिळवला आहे.
मेंढपाळ आर्मी संघटनेच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा!
त्यांचे संघर्षमय जीवन, दिवसरात्र मेहनत, आई-वडिलांच्या कष्टांचे चीज, आणि स्वप्नांवर असलेला विश्वास आज अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरत आहे.
“ग्रंथ वाचन, सातत्य आणि आई-वडिलांचा आशिर्वाद हेच माझ्या यशाचे रहस्य आहे”, असे सांगणारे बिरदेव डोणे समाजातील युवकांना एक नवा मार्ग दाखवत आहेत.

जय मेंढी माऊली…!! जय मल्हार….!!

अंकुश बिरा मुढे
राष्ट्रीय कार्याध्यक्ष, मेंढपाळ आर्मी