चिऊ चिऊ चिऊताई या बाल चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी

भारत कलावंत निर्माण फाउंडेशन आटपाडी
या संस्थेअंतर्गत एसएनजी थिएटर प्रस्तुत
मराठी बाललघुचित्रपट ‘ चिऊ चिऊ चिऊताई या चित्रपटाचे आटपाडी व परिसरामध्ये चित्रीकरण पूर्ण.

आटपाडी ही साहित्यिकांची भूमी आहे या भूमीला साहित्याची व कलेची खूप मोठी परंपरा आहे याचाच वारसा घेऊन मुख्याध्यापक म्हणून काम केलेले सध्या निवृत्त झालेले प्रा. सुरेश गायकवाड शेटफळेकर यांनी ‘ चिऊ
चिऊ चिऊताई’ या चित्रपटाची निर्मिती व लेखन केले आहे. मोबाईलच्या रेडिएशनमुळे सध्या पक्ष्यांची संख्या कमी झाली आहे अशी तक्रार पक्षीप्रेमी करीत आहे.

तसेच सध्या पालक वर्ग आपल्या उत्पन्न वाढवण्याकडे इतके व्यस्त आहे की त्यांच्या मुलांच्या बाल मनाकडे सुद्धा लक्ष देता येईना असे वाटू लागले आहे.
अशा प्रकारचा विषय असणारा हा चित्रपट एप्रिल 2025 पूर्वी युट्युब ‘एसएनजी थिएटर्स’ या चॅनेल वर प्रकाशित केला जाईल.

सदरच्या चित्रपटात प्रमुख भूमिका प्रा. सुरेश गायकवाड शेटफळेकर यांनी कसदारपणे साकारली आहे.
निवृत्तीनंतरही त्यांनी कलेची सेवा चालूच ठेवली आहे. तसेच चिऊ या बालकलाकाराची भूमिका प्रा. टी ए चव्हाण साहेब यांचे चिरंजीव अरुण चव्हाण साहेब यांची कन्या आयुषी ने दमदारपणे अभिनय केला आहे.

तसेच रवींद्र गायकवाड,सुचिता गायकवाड, तनिष्का गायकवाड, रेश्मा गुरव, सतीश विभुते माडगूळकर व प्रा. किशोर चांदणे यांनीही आपल्या भूमिका दमदारपणे निभावल्या आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन हर्षद बनसोडे मुंबई यांनी केले असून, छायाचित्रण नौशाद मुलांनी यांनी केले आहे.नृत्यदिग्दर्शन हिमेश सर यांनी केले आहे.या चित्रपटात प्रोडक्शन मॅनेजर म्हणून नाथासो यम्गर काम पाहत आहेत. सम्यक जीवन स्टुडिओचे सर्वेसर्वा सचिन वाघमारे सर बॅकग्राऊंड म्युझिक, संकलन पाहत आहेत. या चित्रपटातील उत्तरशीर्षक गीत गझलकार सुधीर इनामदार यांनी केले आहे.या चित्रपटाच्या चित्रीकरणlसाठी एन के अण्णा गार्डन,डॉ. अविनाश चव्हाण व संगम डोंबे तसेच डायनॅमिक इंग्लिश स्कूल चे मोलाचे सहकार्य लाभले आहे.

पक्षीप्रेम व बालमनाला स्पर्श करणाऱ्या या चित्रपटाचा प्रीमियर शो लवकरच जाहीर केला जाईल. सर्वांनी या चित्रपटाला सबस्क्राईब करून सहकार्य करावे अशी विनंती निर्माता प्रा. सुरेश गायकवाड शेटफळेकर यांनी केली आहे.