परदेशात शिक्षण आणि नोकरी देण्याच्या बतावण्या करून प्रतिष्ठित डॉक्टर दांपत्याची केली होती फसवणूक
लिवी ओव्हरसीज स्टडी प्रायव्हेट लिमिटेड संस्थेचा प्रताप
जुगनू कोळी आणि तेजस्वी कोळी विरोधात गुन्हा झाला होता गुन्हा दाखल
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
उरण
नवी मुंबई मधील नेरुळ, सिवूड्स येथे राहणाऱ्या डॉक्टर दांपत्याला तब्बल ३ कोटी ३० लाखांचा उरणमधील जुगनू कोळी आणि तेजस्वी कोळी या बंटी-बबलीच्या जोडीने गंडा घाटल्याची घटना घडली होती. याबाबत नवी मुंबई, एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. यातील आरोपिंना न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर परदेशात पलायनाच्या प्रयत्नात असताना, या बंटी बबलीच्या जोडीला दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानातळावरून अटक करण्यात आली आहे.
मुलांना परदेशात शिक्षण आणि डॉक्टर दांपत्याला नोकरी देतो असे सांगून, ‘लिव्ही ओव्हरसीज स्टडीज प्रायव्हेट लिमिटेड’ या संस्थेच्या माध्यमातून संस्थेचे संस्थापक जुगनू कोळी आणि तेजस्वी कोळी यांनी कोट्यावधी रुपये उकळले असल्याबाबत उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून, या गुन्ह्यातील आरोपी बंटी, बबलीने अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात दाद मागीतली होती. मात्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटालला होता. यामुळे न्यायलायीन प्रक्रियेला सामोरे जात कारवाईला सामोरे जावे लागूनये म्हणून, परदेशात जाण्याचा प्रयत्न केला असता, या जोडीला दिल्ली विमानतळावर अटक करून ताब्यात घेण्यात आले आहे. न्यायाल्याने या प्रकारनंतर तेजस्वी कोळी हिला न्यायालयीन कोठडी दिली असून, जुगनू कोळी याला पुढील तपासासाठी तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या संपूर्ण प्रकारामध्ये डॉक्टर दांपत्याच्या दोनही मुलांचे दोन शैक्षणिक वर्षांचे नुकसान झाले आहे. याबाबत नवीमुंबई एनआरआय पोलीस ठाण्यात कलम ४०६, ४२०, ४६५ अन्वये गुन्हा दाखल आहे.आर्थिक फसवणूक करणाऱ्या अशा व्यक्तींना कठोरात कठोर शिक्षा व्हायला पाहिजे असे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती