प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
पिलीव
स्वस्त धान्य दुकानात पारदर्शकता आणण्यासाठी महाराष्ट्र शासनाने पॉश मशीन आणले असून यावर सर्व ग्राहकांच्या रितसर नोंदी करण्यात आल्या यावरुन खरेतर ग्राहकांना त्याच्या रेशनकार्डात असणाऱ्या नावाप्रमाणे रितसर मालाचे वाटप व्हावे यासाठी ही मशीन अत्यंत उपयोगी आहे परंतु ही मशीनच चालत नसल्यामुळे ग्राहकांना गेल्या पंधरा ते विस दिवसापासून दुकानात माल येऊन सुद्धा ग्राहकांना माल मिळत नाही.
यामुळे ग्राहक दुकानाकडे हेलपाटे मारुन अक्षरशः थकले पण मशीनच सुरु नसल्यामुळे त्यांना मालच मिळत नाही. दुकानदार दुकानात मोकळे बसुन अक्षरशः वैतागले पण काही केल्या मशीनच सुरु होईना, जरी मशीन सुरुच झाली तर थोडावेळ चालते व लगेच बंद पडत आहे. खरेतर यामध्ये शासनाचा पारदर्शकता आणण्यासाठी या मशीन आणल्या आहेत पण नेटवर्क म्हणा की इतर कारणामुळे मशीन चालत नाही.
याबाबत शासनस्तरावर दखल घेऊन पर्यायी व्यवस्था करणे आवश्यक आहे. यामुळे दुकानदार व ग्राहक अक्षरशः वैतागले आहेत. गेले महीना झाले माल मशीन चालत नसल्यामुळे तसाच दुकानात पडुन आहे यावर तात्काळ उपाययोजना होण्याची आवश्यकता आहे.

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती