प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
पुणे
कविता सवाखंडे
नेहमीच शैक्षणिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रामध्ये अग्रेसर असणाऱ्या भारती विद्यापीठ इंग्लिश मेडीयम स्कुल लोहगाव येथे वार्षिक क्रीडा दिवस अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. दिनांक 28 11 2024 रोजी शालेय प्रशासनाच्या वतीने शैक्षणिक वर्ष 2024 25 मधील वार्षिक क्रीडा दिवसाचे आयोजन करण्यात आले होते.
दिनांक 25 नोव्हेंबर 2024 ते दिनांक 28 नोव्हेंबर 2024 या कालावधीमध्ये आयोजन करण्यात आलेल्या वार्षिक क्रीडा स्पर्धेमध्ये धावण्याची स्पर्धा, 100 मिटर धावणे,क्रिकेट, डॉज बॉल, लंगडी, लिंबू चमचा इत्यादी क्रीडा प्रकारांची स्पर्धा घेण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात प्रीप्रायमरी चे विद्यार्थी यांच्या कवायतीने करण्यात आली. तसेच क्रीडा स्पर्धेमध्ये ऑरेंज हाऊस, येलो हाऊस, रेड हाऊस, ग्रीन हाऊस . यापैकी ऑरेंज हाऊसला सर्वाधिक गुण मिळवून त्यांनी स्कूलमध्ये अव्वल स्थान मिळवण्याचा बहुमान मिळविला.
सदर कार्यक्रमांमध्ये सन 2024- 2025 या शैक्षणिक वर्षाचा सर्वोत्कृष्ट क्रीडापटू म्हणून मिस अक्षरा खांदवे आणि मास्टर हर्ष काकडे यांचा सन्मानचिन्ह तसेच सुवर्णपदक देऊन सन्मान करण्यात आला.
बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाकरिता प्रमुख पाहुणे म्हणून नेहा सिंग व्यवस्थापक कॅनरा बँक, शाखा वडगाव शिंदे या उपस्थित होत्या, त्यांच्या हस्ते स्पर्धेतील विविध विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले कार्यक्रमाची सांगता शाळेचे मुख्याध्यापक माननीय जॉर्ज पी एस सर यांनी केली. या प्रसंगी त्यांनी उपस्थित सर्व मान्यवर, विद्यार्थी, शिक्षक यांनी सहभागी होऊन कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती