शिल्पसृष्टीसाठी शरद पवार साहेबांना साकडे घालणार !राज राजापूरकर

” कटगुण ” येथे, भारताला प्रेरणा देणारे ज्ञान, संस्काराचे विद्यापीठ व्हावे
सादिक खाटीक यांची मागणी

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी

कटगुण येथे महात्मा फुले यांची शिल्पसृष्टी साकारण्यासाठी राष्ट्रीय नेते खासदार शरदचंद्रजी पवार साहेबांना साकडे घालणार असल्याच्या भावना राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर यांनी व्यक्त केल्या . तर, महात्मा फुले यांची कुलभूमी ” कटगुण “, हे भारताला पुरोगामी, समतावादी, धर्मनिरपेक्षतेची प्रेरणा देणारे ज्ञान – संस्काराचे परिपूर्ण विद्यापीठ व्हावे . अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार ओबीसी विभागाचे प्रदेशचे उपाध्यक्ष तथा कुरेश कॉन्फरन्सचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सादिक खाटीक आटपाडी यांनी केली आहे .

आधुनिक भारताचे शिल्पकार महात्मा जोतिबा फुले यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त त्यांच्या कुलभूमी – पुण्यभूमी कटगुण येथे जावून सादिक खाटीक यांनी महात्मा फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन केले . या पुण्यस्मरण दिनाचे औचित्य साधून राज्यातल्या विविध दैनिकांशी आटपाडीतून बोलताना सादिक खाटीक यांनी ही मागणी केली .
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी ओबीसीच्या राज्यभरातल्या बॉटम टू टॉप च्या असंख्य पदाधिकाऱ्यांनी सातारा जिल्ह्याच्या कोरेगाव तालुक्यातल्या कटगुण येथे एकत्र येत महात्मा फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन केले . छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीमाई फुले, छत्रपती शाहुजी महाराज, डॉ . बाबासाहेब आंबेडकर या महामानवांचे स्मरण केले . त्यांचे कृतीशील, सर्वसमावेशक, सर्वमान्य, सर्वस्पर्शी, सर्वप्रिय आणि सर्वोत्तम विचार, सृष्टीच्या अंतापर्यत प्रेरक राहणार असल्याने या संस्काराच्या दीपस्तंभाचे सदैव स्मरण करणे, त्यांच्या विचारधारेचे अनुकरण करणे, हे प्रत्येकाचे परम भाग्याचे आणि देशहिताचे महत्वपूर्ण कार्य ठरणार असल्याचे मत अनेक मान्यवरांनी व्यक्त केले .

महात्मा फुले यांच्या विचारधारेला प्रमाण मानून, जीवन समर्पित करीत, लक्षवेधी कार्य करणाऱ्या राज्यातल्या पुरुष अथवा महिला यापैकी एका कार्यकर्त्याला पंचवीस हजार रुपयांचे रोख पारीतोषीक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार ओबीसी विभागाचे वतीने देण्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष राज राजापुरकर यांनी केली . तसेच कटगुण येथील विविध प्रशालेल्या विद्या, कला, सांस्कृतीक क्रीडा वगैरे विविध विभागात उत्तम कामगिरी करणाऱ्या अनेक विद्याथी, विद्यार्थीनींनी यांनाही पुरस्काराने गौरविण्यात राष्ट्रवादी ओबीसी विभाग आग्रही राहील, सदर गुणवंत प्रज्ञावंत निवडण्याचे काम स्थानिक ट्रस्टने करावे . अशी भूमिका त्यांनी जाहीर केली . कटगुणची पवित्र माती प्रतिदिनी भाळी लावता यावी म्हणून येथील माती घेऊन जात असल्याचे राज राजापूरकर यांनी जाहीर केले . कटगुण येथे महात्मा फुले यांची शिल्पसृष्टी व इतर अनेक सोपस्करांविषयी आपण लवकरच राष्ट्रीय नेते खासदार श्री . शरदचंद्र पवार साहेब, खासदार सुप्रियाताई सुळे यांचे लक्ष वेधणार असल्याचे राज राजापुरकर यांनी स्पष्ट केले .
अभिवादन प्रसंगी कटगुण येथे सादिक खाटीक, असिफ खलिफे, सलीम बेग, जालींदर कटरे, अरुण तोडकर, माजी सरपंच तथा ट्रस्ट अध्यक्ष सुधीर गोरे, माजी सरपंच रामचंद्र मोहन गोरे, अर्जुन गायकवाड, किरण गोरे, विजय शिंदे, माजी सैनिक प्रकाश गोरे, माजी उपसरपंच जयदीपराव गायकवाड, माजी सरपंच तथा पोलीस पाटील जयश्री गोरे, रवी माने, अमर गोरे प्रल्हाद काळोखे, नितीन गोरे प्रकाश चव्हाण, सलीम चौगुले, इस्माईल शेख, असिफ उर्फ बाबु खाटीक आटपाडी , असिफ कुरेशी आटपाडी इत्यादी अनेक मान्यवर उपस्थित होते .

जगाला प्रेरणादायी ठरणारे प्रचंड कार्य कर्तृत्व महात्मा जोतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांनी केले आहे . सामाजीक कार्याचा प्रचंड शिखर उभा करणारे महात्मा जोतिबा फुले महाराष्ट्राचेच नव्हे संपूर्ण भारताचे गौरव आहेत . जगाला स्फूर्ति, प्रेरणा देणाऱ्या महात्मा फुले यांचे कुलभुमी कटगुण येथे अर्धा किमी परिघात शिल्पसृष्टी, संस्कारपीठ आणि सर्वच विद्यांचे आगर ठरणारे सर्वसंपन्न विद्यापीठ उभारून राज्य आणि केंद्र सरकारने महात्मा फुले यांच्या कार्याचा गौरव करावा . करोडो भारतीय संस्कारक्षम, समाजाभिमुख आणि उत्तम नागरीक बनावेत यासाठी या स्मारकाचा उपयोग व्हावा . देशातल्या लाखो शाळा, महाविद्यालयातले विद्यार्थी येथे यावेत . फुले दाम्पत्यांच्या कार्याचा समृद्ध वसा वारसा त्यांनी अभ्यासावा . नोकरी, व्यवसाय, उद्योग इत्यादी क्षेत्रात आरंभ करणाऱ्या प्रत्येकाने कटगुणला येवून नतमस्तक होत आपल्या जीवनकार्याची सुरुवात करावी, अशा उत्तुंग स्वरूपाचे हे संस्कारी, सर्वस्पर्शी विद्येचे विद्यापीठ कटगुणची नवी ओळख बनावे . अशी प्रांजळ भावना विविध दैनिकांशी बोलताना सादिक खाटीक यांनी व्यक्त केली .
सर्व भारत भरातून कटगुणला येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थी – विद्याथीनी – शिक्षक – शिक्षण क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांना, येण्या – जाण्याचा संपूर्ण प्रवास मोफत केला जावा . कटगुण ला किमान एक हजार विद्यार्थी, विद्यार्थीनींनी, शिक्षक, कर्मचारी, मुक्कामी राहतील अशा सर्व सोयी नियुक्त मोठ्या विश्रांतीगृहाची निर्मिती केली जावी . प्रचंड विस्ताराची अभ्यासिका, समृद्ध ग्रंथालय, सर्वांच्या विरंगुळ्यासाठी पशु,पक्षी, प्राण्यांसहच्या समृद्ध गार्डनची निर्मिती येथे व्हावी . हे संस्कारपीठ देशातल्या पर्यटकांचेही खास आकर्षण ठरावे, अशा विविधतेने समृद्ध करावे . देशासाठी शहीद झालेल्या प्रत्येकाच्या नावाचा उल्लेख असणारे कटगुणातील अनेक फलक प्रत्येकाच्या अंतःकरणात देशप्रेम वाढीत लावणारे ठरावेत .

देशस्तरावरच्या स्वातंत्र्यसेनानींच्या कार्याची ओळखही या स्मारकातून सर्वांना व्हावी . इतके समृद्ध असे शेकडो कोटी रुपये खर्चाचे हे संस्कार आणि सर्वसंपन्न शिक्षणाचे विद्यापीठ तातडीने उभारून महात्मा फुले, सावित्रीमाई फुले या खऱ्या भारतरत्नांच्या कार्य कर्तृत्वाला राज्य आणि केंद्र शासनाने मानवंदना द्यावी . अशी मागणी करणारी अपेक्षाही सादिक खाटीक यांनी विविध वृत्तपत्रांशी बोलताना केली.

खातगुण – कटगुण परिसरातल्या पीर राजेबागसवार आणि मलंगबाबा यांच्या जियारत साठी येणाऱ्या प्रत्येक भावीक भक्तानी आणि विशेषत : मुस्लीम बंधु भगिनी भावीकांनी येथील धार्मिक सोपस्करानंतर, कटगुण येथील महात्मा फुले यांच्या कुलभूमीला अवश्य भेट द्यावी . भारतात सर्वप्रथम मुली मुलांच्या मोफत व सार्वत्रिक शिक्षणाचा पाया घालणाऱ्या फुले दाम्पत्यांच्या कार्य कर्तृत्वामुळेच कोट्यावधी भारतीयांचे जीवन परिपूर्ण समृद्ध झाले आहे . सर्वच क्षेत्रात प्रचंड मागे पडलेल्या मुस्लीमां मधील उपेक्षीत, वंचित, मागासलेपण, प्रचंड दैन्य – दारीद्रय यावरचा सर्वोत्तम उपाय म्हणजे फुले दाम्पत्यांची समग्र विचारधारा आणि शिक्षण प्रणालीला आत्मसात करणे होय . आणि याच उदात्त भावनेने भारतातील सर्वच मुस्लीमांनी शिव – फुले – शाहू – आंबेडकर यांच्या कार्यप्रणाली विचाराला शिरोधार्य मानावे .

कटगुण च्या महात्मा फुले यांच्या कुलभूमीतून याच विचारधारेचे सत्व घेऊन घरी परतावे . शैक्षणीक सामाजीक क्रांतीचा हा दिव्यमार्ग मुस्लीमांसह सर्वांच्या जीवनात प्रचंड प्रकाश पाडणारा राजमार्ग ठरेल . अशी भावना ही सादिक खाटीक यांनी शेवटी व्यक्त केली .