प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
सांगली
सांगली जिल्ह्यातील 286-खानापूर विधानसभा सार्वत्रिक निवडणूक करिता मतमोजणी निरीक्षक म्हणून श्री. क्रित्यानंद रंजन हे सांगली जिल्ह्यामध्ये आले आहेत. त्यांच्या कार्यालयाचा पत्ता “मतमोजणी निरीक्षक, 286 खानापूर विधानसभा मतदारसंघ, शासकीय विश्रामगृह विटा” असा आहे. त्यांचा ई मेल आयडी countingobserver286@gmail.com असा असून भ्रमणध्वनी क्रमांक 7709072311 हा आहे.
मतमोजणी निरीक्षक हे दिनांक 21 नोव्हेंबर 2024 पासून 286 खानापूर विधानसभा मतदारसंघात आहेत. 286 खानापूर विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मधील उमेदवारांच्या निवडणूक मतमोजणी सबंधी काही तक्रार असल्यास दिलेल्या ई मेलवर अथवा भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क करावा अथवा कार्यालयीन दिवशी सकाळी 9 ते 11 या वेळेत कार्यालयात समक्ष येऊन भेटावे, असे आवाहन 286 खानापूर विधानसभा मतदारसंघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मतमोजणी निरीक्षक संपर्क अधिकारी योगेश्वर टोपे यांनी केले आहे.

संबंधित बातम्या
औषध विक्री दुकानांत सीसीटीव्ही बसवण्याचे आवाहन
सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी वाढीव निधी देऊ – उपमुख्यमंत्री अजित पवार
दहिवडी न्यायालयाच्या वतीने राष्ट्रीय लोकअदालतीचे यशस्वी आयोजन