प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी:
आटपाडी येथे संत सावतामाळी मठाचे पाठीमागे घोडके मळा येथे महिंद्रा कंपनीच्या गाडीत एक पुरुष जातीचे अनोळखी प्रेत आढळून आले.याबाबतची फिर्याद अमित बाळासो फडतरे यांनी आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये दिले आहे.
अंदाजे 35 ते 40 वर्षे वयाचे कुजलेल्या अवस्थेत संपूर्ण त्वचा काळपट पडलेली व त्वचा गेलेली अशा अवस्थेत पुरुष जातीचे हे प्रेत एम एच ०९ बी एम ७३६३ या महिंद्रा कंपनीच्या गाडीत आढळले.प्राथमिक तपास करणेकामी सहाय्यक पोलीस निरीक्षक जयवंत जाधव,पोलीस हवालदार माघाडे यांनी घटनास्थळी भेट दिली.सहाय्यक पोलीस निरीक्षक जयवंत जाधव घटनेचा तपास करीत आहेत.

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती