म्हसवड इंजबाव रोडवर म्हसोबा मंदिराजवळ कार चा अपघात होऊन इंजबाव येथील तरुण ठार

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
म्हसवड

म्हसवड- इंजबाव रोडवर म्हसवड पासून २किमी अंतरावर असलेल्या म्हसोबा मंदिराजवळ चारचाकी कारचा अपघात होऊन बापूसाहेब तुकाराम कापसे वय २७ वर्ष रा. इंजबाव हा जागेवच मयत झाल्याची फिर्याद बाळू बाबा कापसे वय ७० रा .इंजबाव यांनी म्हसवड पोलीस ठाण्यात दिली आहे
याअपधाताबाबत म्हसवड पोलीस ठाण्यातून मिळालेली बातमी अशी मयत बापूसाहेब कापसे याचे चुलते बाळू कापसे यांनी म्हसवड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की माझा चुलत भाऊ तुकाराम कापसे हा माझ्या शेजारीच इंजबाव येथे राहण्यास असून त्याला बापूसाहेब कापसे हा एकच मुलगा आहे दोघेही कामानिमित्त मुबंईला राहणेस आहे चुलत मुलगा बापूसाहेब हा गेले चार दिवसापूर्वीच गावी इंजबाव येथे आपली शेवरलेट कार क्र MH14CS2725 ही घेऊन आला होता
बुधवार दि ८ रोजी रात्री ११ वाजण्याच्या दरम्यान म्हसवड गावच्या हद्दीत इंजबाव ते म्हसवड जाणाऱ्या डांबरी रोडवर म्हसोबा मंदिराजवळ बापूसाहेब कापसे वय २७ रा इंजबाव ता माण हा त्याची कार क्र MH14CS2725 मधून म्हसवडला येत असताना त्याची कार रस्त्यावरुन खाली नाल्यात जाऊन धडकुन लांबवर जाऊन अपघात होऊन या अपघातात माझा पुतण्या बापूसाहेब कापसे हा जागीच मयत झाला असल्याची फिर्याद म्हसवड पोलीस ठाण्यात दिली असून अधिक तपास सपोनि राजकुमार भुजबळ करत आहेत

बापूसाहेबने बुधवारी रात्री ११ वाजता आपल्या आईला सांगीतले की मी अर्ध्या तासात परत येतो म्हणून गेला तो सकाळ पर्यंत परत घरी आला नाही दुसऱ्यादिवशी सकाळीच कार अपघातात मयत झाल्याची खबर मिळाली