माळशिरसचे नगराध्यक्ष डॉ. आप्पासाहेब देशमुख यांना पितृशोक

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
माळशिरस

माळशिरस ६१ फाटा येथील प्रगतशील बागायतदार एकनाथ भिकू देशमुख यांचे अल्पशा आजाराने वयाच्या ७४ व्या वर्षी गुरुवार दि. ०२/०३/२०२३ रोजी रात्री ११ वा. उपचार घेत असताना दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
माळशिरस नगरपंचायतचे नगराध्यक्ष डॉ. आप्पासाहेब देशमुख यांचे ते वडील होते. त्यांच्या जाण्याने माळशिरस शहर व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.